Join us  

डोशाचं पीठ तव्याला चिकटतं-डोसा तुटतो? रवा डोसा करताना ४ टिप्स, परफेक्ट होईल डोसा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 7:29 PM

How To Make Perfect Rava dosa At Home : डोसा तुम्ही घरच्याघरी बनवून खाऊ शकता. डोसा परफेक्ट क्रिस्पी बनवण्यासाठी तुम्ही नॉन स्टिक किंवा कास्ट आयर्न पॅनचा वापर करू शकता. 

डोसा (Rava Dosa) हा अनेकांचा आवडता नाश्ता आहे. लोक आपलं आवडतं अन्न डोसा मन भरून खातात. ज्या लोकांना लाईट क्रिस्पी डोसा खाण्याची इच्छा होते त्यांनी रवा डोसा खायला हवा. रवा डोसा खूपच लाईट असतो पण याची चव सुंदर असते. लोक रवा डोसा रेस्टाँरंटमध्ये जाऊन खाणं पसंत करतात. डोसा तुम्ही घरच्याघरी बनवून खाऊ शकता. (How To Make Perfect Rava Dosa At Home)

घरच्याघरी रवा डोसा डोसा बनवणं कठीण नाही फक्त तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.  रवा डोसा घरी करताना लोक नकळतपणे चुका करतात ज्यामुळे डोशाची चव बिघडते. वेळ आणि मेहनत दोन्ही वाया जाते. रवा डोसा घरी बनवताना कोणत्या चुका टाळायला हव्यात ते समजून घेऊया.

डोक्यावरचे केस पांढरे झालेत? ना डाय ना हेअर कलर; 3 घरगुती उपाय करा, दाट-काळे होतील केस

जेव्हा तुम्ही घरी रवा डोसा बनवता तेव्हा बॅटर कंसिस्टंसी काळजी घ्यायला हवी. अनेकदा असं होतं की बॅटर खूपच घट्ट होतं की जास्त पातळ होतं. असं केल्यानं डोसा चांगला बनत नाही. जेव्हा डोसा बॅटर खूप जास्त थिक होत तेव्हा जेव्हा डोसा जड होतो. त्यात कुरकुरीतपणा येत नाही. जर डोशाचा पीठ पातळ असेल तर डोसा चांगला फुलतो. यासाठी बॅटर कंसिस्टंसीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. 

डोश्याचं पीठ पातळ आहे की नाही ते पाहा

जेव्हाही तुम्ही रवा डोसा बनवता तेव्हा बॅटर फरमेंटेशनची खास काळजी घ्या. जर बॅटर व्यवस्थित फरमेंट होत नसेल किंवा प्रमाणापेक्षा जास्त फरमेंट होत असेल तर याची चव अजिबात चांगली लागणार नाही. रवा बॅटरसाठी रेग्युलर डोसा बॅटरप्रमाणे फरमेंटेशनची आवश्यकता नसते. यासाठी तुम्ही कमीत कमी अर्ध्या तासासाठी पीठ बाजूला ठेवणं आवश्यक आहे.

ओपन पोर्समुळे चेहरा खराब-डल झाला? डॉक्टर सांगतात खास उपाय, ओपन पोर्स १ दिवसात गायब

कमी तेल वापरणं

अनेकदा लोक जेव्हा रवा डोसा बनवतात तेव्हा कमी तेलाचा वापर कतात. जेव्हा तुम्ही कमी तेलाच्या मदतीने डोसा बनवता तेव्हा डोसा तव्याला चिकटतो आणि क्रिस्पी बनत नाही. म्हणूनच रवा डोसा तयार करता योग्य प्रमाणात तेलाचा वापर करा. डोसा अधिक क्रिस्पी बनतो. 

नॉन स्टिक पॅनचा वापर करा

जेव्हा तुम्ही रवा डोसा बनवता तेव्हा कोणत्या प्रकारचा पॅन वापरता ते खूप महत्वाचे आहे.  जर तुम्ही जुना नॉन स्टिक पॅन  वापरला तर डोसा  तव्याला चिकटेल त्यामुळे डोसा बनवणं कठीण होईल. डोसा परफेक्ट क्रिस्पी बनवण्यासाठी तुम्ही नॉन स्टिक किंवा कास्ट आयर्न पॅनचा वापर करू शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.