Join us  

कुकरमध्ये भात लगदा होतो किंवा फडफडीत राहतो? ३ टिप्स, भात होईल परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2023 12:08 PM

How to make perfect rice in pressure cooker कुकरमध्ये भात शिजवताना या ३ गोष्टी लक्षात ठेवा, भात करपणार नाही, कुकरही बिघडणार नाही..

आपल्यापैकी बरेच जण जेवण बनवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतात. कारण प्रेशर कुकरमध्ये कोणताही पदार्थ झटपट शिजतो. मुख्य म्हणजे भात प्रेशर कुकरमध्ये लगेच तयार होतो. भात शिजला आहे की नाही, हे आपल्याला शिट्टीमधून कळते. अनेक वेळा कुकरची शिट्टी होत नाही, ज्यामुळे भात करपतो, व त्याची चव देखील बिघडते.

कुकरमध्ये भात करपला की तो तळाशी चिकटतो. संपूर्ण भातामधून करपलेला वास येतो. अशा स्थितीत कुकरमध्ये भात लावताना कोणती काळजी घ्यावी? अशा प्रकारच्या समस्या टाळण्यासाठी काय करावे? भात कुकरमध्ये करपण्यापासून कोणत्या टिप्स फॉलो कराव्या? हे जाणून घेऊयात(How to make perfect rice in pressure cooker).

कुकरचे रबर तपासा

कुकरमध्ये तांदूळ लावण्यापूर्वी त्याचे रबर नीट तपासणे अत्यंत आवश्यक आहे. कुकरच्या झाकणावरील रबर दाब रोखण्याचे काम करते. त्यामुळे तांदूळ शिजणे सोपे जाते. जेव्हा जास्त वाफ तयार होते, ती शिट्टीद्वारे बाहेर पडते. रबर नीट तपासून लावल्यानंतर भात करपत नाही.

पावसाळ्यात कांदे - बटाटे लवकर सडतात, कोंब फुटतात? ३ टिप्स, कांदे बटाटे टिकतील भरपूर

शिट्टी तपासा

प्रेशर कुकरमधील शिट्टी अत्यंत महत्वाचे काम करते. शिट्टीशिवाय कुकर काम करू शकत नाही. कारण शिट्टीमुळेच कुकरमधील पदार्थ शिजण्यासाठी मदत होते. कुकरची शिट्टी बरोबर नसेल तर, जेवणाची चवही बिघडते. अशा वेळी कुकरमध्ये भात शिजवताना आधी शिट्टी तपासून घ्या. त्यामुळे भात करपण्याचा धोका कमी होतो.

पावसाळ्यात करायलाच हवा मेदू वड्यांचा खमंग-कुरकुरीत बेत, घ्या मेदूवड्याची पारंपरिक रेसिपी

तेल घाला

अनेकदा प्रेशर कुकर नीट काम करत नाही, त्यातील पदार्थ नीट शिजत नाही. किंवा करपण्याचा धोका वाढतो. कारण शिट्टीवरून भात शिजला आहे की नाही, हे कळून येते. अशा स्थितीत भात मोकळा तयार व्हावा व करपू नये असे वाटत असेल तर, त्यात एक चमचा तेल घाला. यामुळे भात तळाशी चिकटणार नाही. भाताचा गचका होणार नाही, मोकळा शिजेल.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स