आपल्या जेवणातील सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे चपाती. चपातीशिवाय भारतीय थाळी अपूर्ण आहे. स्वयंपाक शिकत असताना आपण सुरुवातीला चपाती शिकतो. पण पहिल्याच ट्रायमध्ये चपाती गोल व मऊ बनेलच असे नाही. गोल टम्म फुगलेली चपाती प्रत्येकाला बनवायला जमेलच असे नाही. सुरुवातीला गोल व मऊ चपाती काही केल्या करता येत नाही. ती कडक होते, विचित्र वेडीवाकडी लाटली जाते. चपातीचे विविध नकाशे बनतात. नवशिक्यांसाठी म्हणूनच या खास टिप्स, चपात्या जमतील छान(How to Make Perfect Round Chapati).
१. सर्वात आधी कणीक चांगली मळून घ्या. कणकेचा गोळा घ्या. व तो पोळपाटावर ठेवा, त्यावर पीठ शिंपडून हाताने गोल आकार द्या. लाटताना मध्यभागी जास्त लाटू नका. याने चपाती पातळ होते. व भाजल्यानंतर कडक होते. त्यामुळे कडे-कडेने लाटत जा. व मिडीयम आकारात जाडसर चपाती हलक्या हाताने लाटून घ्या.
ताक म्हणजे उन्हाळ्यात अमृत, पण मीठ घालून ताकात पिताय का? कुणी टाळलेलंच बरं..
२. चपाती लाटून देखील गोल आकाराची होत नसेल तर, वाटीची मदत घ्या. गोल वाटी किंवा मध्यम आकाराचा बाऊल घ्या. चपाती लाटून झाल्यानंतर चपातीवर ठेवा. व बाकीचा भाग चाकूने कापा. याने चपातीला परफेक्ट गोल आकार येईल. आपण पुरी करताना ज्याप्रकारे वाटीचा वापर करतो. त्याचप्रमाणे चपाती तयार करा.
करा अस्सल मराठी चवीची सांडग्यांची झणझणीत आमटी, टेस्ट अशी की तोंडाला चवच येईल
३. चपाती बनवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे रोटी मेकरचा वापर करून चपाती बनवणे. या मशीनमुळे सहज सोप्यारित्या गोल चपात्या काही सेकंदात तयार होतात. लाटण्याची झंझटच नाही.