Join us  

विकतच्या मेदूवड्याला असतो तसा गोल आकार जमत नाही ? २ झटपट ट्रिक्स, करा उडपीस्टाइल वडा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 4:06 PM

Learn How To Make Perfect Shape Medu Vada :आपण घरी मेदू वडा करतो पण तो गोल होत नाही, म्हणूनच वापरुन पाहा ही सोपी ट्रिक.

मेदू वडा, इडली, डोसा, उत्तपा असे दाक्षिणात्य पदार्थ आपल्याकडे बहुतेकवेळा नाश्त्याला अगदी आवडीने खाल्ले जातात. गरमागरम मेदू वडा त्यावर आंबट - गोड चवीचे सांबार सोबत ओल्या नारळाची चटणी असं परफेक्ट कॉम्बिनेशन खायला कुणाला नाही आवडणार. सकाळच्या नाश्त्याला काहीतरी गरमागरम, क्रिस्पी खावंसं वाटलं तर मेदू वडा हा एक उत्तम पर्याय असू शकतो. मेदूवडा खायला कुरकुरीत, खमंग असतात. या पदार्थाची रेसिपी सुद्धा तितकीच सोपी असते. आपण काहीवेळा हे मेदू वडे घरीच बनवतो तर काहीवेळा उडप्याकडून विकत आणतो. घरी बनवलेले मेदू वडे उडप्याकडून विकत आणलेल्या मेदू वड्यासारखे (Medu vada with an easy and unique shaping method) बनत नाहीत अशी अनेक गृहिणींची तक्रार असते(Trick to make perfect medu vada).

मेदू वडा (How to get medu vada shape?) हा उडीद डाळीपासून बनवलेला दक्षिण भारतीय पदार्थ आहे. हे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असतात आणि अगदी डोनटसारखे दिसतात. दक्षिण भारतीय समाजाखेरीज भारताच्या विविध प्रांतात हा पदार्थ नाश्त्यामध्ये समाविष्ट केला जातो. जेव्हा आपण कुटुंबासोबत कधी बाहेर उडप्याकडे दक्षिण भारतीय पदार्थ खायला जातो तेव्हा मेदू वडा नक्कीच ऑर्डर करतो. परंतु हा पदार्थ आपण घरी करून पाहायचा झाला तर आपल्याला बाहेरच्यासारखा (Learn How To Make Perfect Shape Medu Vada) घरी बनवायला जमत नाही. किंबहुना या पदार्थाला दिलेला डोनटसारखा (Medu vada shape tricks) आकार आपण घरी कितीही प्रयत्न करून आपल्याला देता येत नाही. उडप्यासारखा मेदू वडा घरी बनवता यावा आणि त्या वड्याला असणारा परफेक्ट गोल आकार देण्यासाठी काही टीप्स समजून घेऊयात(Try this unique Medu Vada with some tips and tricks to make perfect Shape).

परफेक्ट उडपीस्टाइल गोल - गरगरगरीत मेदू वडा करण्याच्या ट्रिक्स... 

१. सर्वातआधी एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात चहाची गाळण संपूर्णपणे भिजवून घ्यावी. ही भिजवलेली गाळण उलटी धरुन म्हणजेच चहाच्या गाळणीचा गोलाकार डोमशेप भाग वर येईल अशी हातात पकडावी. या भिजवून घेतलेल्या गाळणीवर चमच्याच्या मदतीने मेदुवड्याचे पीठ घालावे. मेदू वड्याचे पीठ घातल्यानंतर त्याला हाताने गोल आकार द्यावा. त्यानंतर मेदू वड्याच्या बरोबर मधोमध गोल छिद्र करुन घेण्यासाठी आपल्या बोटांला थोडेसे पाणी लावून घ्यावे. त्यानंतर बरोबर मधोमध बोटाने छिद्र (Easy trick to Shape Medu Vada) पाडून घ्यावे. आता ही गाळणी हलकीशी आपटून त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्यावे. व ही गाळण कढईतल्या तेलात उलटी करुन मेदू वडा तळण्यासाठी तेलात सोडून घ्यावा. गाळणीच्या तळाशी पाणी लावून घेतल्यामुळे हा वडा योग्य आकार घेऊन अगदी व्यवस्थित पद्धतीने तेलात सोडला जातो. 

फ्रेंच फ्राईज परफेक्ट होण्यासाठी शेफ पंकज भदोरिया सांगतात ५ स्टेप्स, उपवासाला खा रेस्टाॅरण्टसारखे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज...

नवरात्र स्पेशल : नेहमीची तीच ती साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात ? त्याच पारंपरिक साबुदाणा खिचडीला द्या हटके ट्विस्ट...

झटपट डाळिंब सोलण्याच्या २ सोप्या ट्रिक्स, डाळींब चटकन सोलून पटकन खा !

२. चहाच्या गाळणीसोबतच आपण मेदू वड्याला आकार देण्यासाठी गोल पळी किंवा झाऱ्याचा देखील वापर करु शकता. पळी किंवा झाऱ्याला पाण्यात बुडवून घ्या, व त्यावर मेदू वड्याचे तयार पीठ गोल आकारामध्ये ठेवा, व त्याला मेदू वड्याचा आकार द्या. दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात झाऱ्यावर तयार केलेले गोल आकाराचे मेदू वडे सोडा. व दोन्ही बाजूने मिडीयम फ्लेमवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. 

नवरात्र स्पेशल : साबुदाणा व भगर वापरून चटकन बनवा उपवासाचा डोसा, खायला कुरकुरीत, बनवायला सोपा...

अशा प्रकारे आपण या २ सोप्या ट्रिक्सचा वापर करून झटपट घरच्या घरी मेदू वड्याला परफेक्ट उडपीस्टाइल गोल आकार देऊ शकतो.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स