Lokmat Sakhi >Food > १० मिनिटांत डाळ वडा, इन्स्टंट नाही तर परफेक्ट साऊथ इंडियन! कसा?- ही घ्या सोपी ट्रिक...

१० मिनिटांत डाळ वडा, इन्स्टंट नाही तर परफेक्ट साऊथ इंडियन! कसा?- ही घ्या सोपी ट्रिक...

How To Make Perfect South Indian Style Dal Vada At Home : साऊथ इंडियन डाळ वडा करायला वेळ लागतोच, पण डाळ वडा प्री मिक्सची ही युक्ती काम करेल सोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 05:55 PM2023-06-16T17:55:21+5:302023-06-16T18:24:21+5:30

How To Make Perfect South Indian Style Dal Vada At Home : साऊथ इंडियन डाळ वडा करायला वेळ लागतोच, पण डाळ वडा प्री मिक्सची ही युक्ती काम करेल सोप

How To Make Perfect South Indian Style Dal Vada At Home | १० मिनिटांत डाळ वडा, इन्स्टंट नाही तर परफेक्ट साऊथ इंडियन! कसा?- ही घ्या सोपी ट्रिक...

१० मिनिटांत डाळ वडा, इन्स्टंट नाही तर परफेक्ट साऊथ इंडियन! कसा?- ही घ्या सोपी ट्रिक...

दक्षिण भारतीय पदार्थ आपल्या प्रत्येकाच्या आवडीचे आहेत. इडली, डोसा, मेदू वडा, डाळ वडा हे पदार्थ लोकं चवीने खातात. नाश्तासाठी हे पदार्थ आपल्या प्रत्येकाच्याच घरी मोठ्या आवडीने बनवले जातात. अनेकांना डाळ वडा हा पदार्थ प्रचंड आवडतो. डाळ वडा हा पदार्थ विविध डाळीचा वापर करून तयार केला जातो. हा पदार्थ फक्त चवीसाठी उत्कृष्ट नसून, डाळीतील बरेच पौष्टीक घटक शरीराला मिळतात. त्यामुळे डाळ वडा हा प्रोटीन व इतर पौष्टीक घटकाने परिपूर्ण असतो.

डाळ वडा हा जरी दक्षिण भारतीय पदार्थ असला तरीही तो संपूर्ण देशभरात अगदी आवडीने खाल्ला जातो. गरमागरम डाळ वडा हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना तेवढाच प्रिय आहे. आपल्याला रोजच्या त्याच उपमा, पोहे, शिरा, इडली नाश्त्याचा कंटाळा आला असेल तर आपण नाश्त्याला पौष्टिक आणि चविष्ट असा डाळ वडा बनवू शकतो. डाळ वडा बनवायला अतिशय सोपा आहे. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी आपण डाळ वड्याच्या बनवून ठेवलेल्या प्रिमिक्स पासून झटपट होणार नाश्ता तयार करू शकतो. झटपट डाळ वडे तयार करण्यासाठी त्याचे प्रिमिक्स कसे तयार करावे याची सोपी कृती(How To Make Perfect South Indian Style Dal Vada At Home).    

साहित्य :- 

१. तांदूळ - १ कप 
२. तूर डाळ - १ कप 
३. मसूर डाळ - १ कप 
४. चणा डाळ - १ कप 
५. मूग डाळ - १ कप 
६. उडीद डाळ - १ कप 
७. सुक्या लाल मिरच्या - ४ ते ५ 
८. कसुरी मेथी - १ टेबलस्पून 
९. भाजलेले तीळ - १ टेबलस्पून 
१०. जिरे पावडर - १ टेबलस्पून
११. सुंठ पावडर - १ टेबलस्पून 
१२. हिंग - १/२ टेबलस्पून 
१३. आमचूर पावडर - १ टेबलस्पून 
१४. मीठ - १ टेबलस्पून 

हॉटेलपेक्षा चमचमीत ‘हरियाली पनीर’ घरच्याघरी १५ मिनिटांत तय्यार! पाहा स्टार्टरची सोपी रेसिपी...

मस्त- खमंग- खुसखुशीत धपाटे एकदा खाऊन तर पहा! मराठवाड्याची खास पारंपरिक डिश, शाळेच्या डब्यासाठी परफेक्ट...

कृती :- 

१. सर्वप्रथम तांदूळ, तूर डाळ, मसूर डाळ, चणा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ हे सर्व एकत्रित करून एका कढईत कोरडे भाजून घ्यावे. 
२. हे सर्व जिन्नस कोरडे भाजून घेतल्यानंतर एका मोठ्या डिशमध्ये काढून थोडे गार करून घ्यावेत. 
३. या सर्व डाळी व्यवस्थित गार झाल्यानंतर त्या मिक्सरमध्ये व्यवस्थित पीठ होईपर्यंत वाटून घ्याव्यात, या डाळी मिक्सरमध्ये वाटून घेताना त्यात ४ ते ५ सुक्या मिरच्या घालाव्यात. 
४. मिक्सरमध्ये पीठ वाटून घेतल्यानंतर ते एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावे. त्यानंतर या पिठात कसुरी मेथी, भाजलेले तीळ, जिरे पावडर, सुंठ पावडर, हिंग, आमचूर पावडर व चवीनुसार मीठ घालावे. आता हे सगळे जिन्नस चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यावे. डाळ वड्याचे प्रिमिक्स तयार आहे. हे तयार झालेले प्रिमिक्स एका हवाबंद डब्यांत भरुन ठेवल्यास किमान ३ महिने तरी ते व्यवस्थित राहते. 
५. जेव्हा आपल्याला डाळ वडे बनवायचे असतील तेव्हा या पिठात एक कप बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, व बटाटा किसून घालावा थोडेसे पाणी घालून हे पीठ मळून घ्यावे. 
६. आता या तयार पिठाचे छोटे छोटे गोळे करून तेलात खरपूस तळून घ्यावेत. 

ढोकळा हवा तसा मनासारखा फुलून येत नाही ? सोडा घालण्याची पद्धत तर चुकत नाही ना...

गरमागरम डाळ वडे खाण्यासाठी तयार आहेत. हे डाळ वडे हिरव्या चटणी सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावेत.

Web Title: How To Make Perfect South Indian Style Dal Vada At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.