Join us  

हॉटेलसारखी परफेक्ट व्हाईट ग्रेव्ही आता बनवा घरच्याघरी, स्वयंपाक होईल झटपट चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2022 11:33 AM

How To Make Perfect Tasty White Gravy at Home : प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया आपल्याला त्याची सोपी रेसिपी सांगत आहेत.

ठळक मुद्देहॉटेलसारखी टेस्टी भाजी करायची तर व्हाईट ग्रेव्ही शिकायलाच हवीरेड आणि ग्रीन ग्रेव्हीला उत्तम पर्याय, झटपट होणारी व्हाईट ग्रेव्ही

हॉटेलमधल्या भाज्या आपण अतिशय चवीने खातो पण त्याच भाज्या घरात केल्या की मात्र नाक मुरडतो. कधी मेथी मलाई, मटार पनीर किंवा मिक्स व्हेज अशा भाज्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. घरात मात्र अशा भाज्या केल्या की तितक्या आवडीने त्या खाल्ल्या जात नाहीत. आता असे काय कारण असावे की घरात आपण या भाज्या खात नाही. तर या भाजीची ग्रेव्ही हेच यामागील महत्त्वाचे कारण असते. अनेकदा आपण घरी भाज्यांसाठी रेड किंवा ग्रीन ग्रेव्ही करतो पण व्हाईट ग्रेव्ही आपण फारशी करत नाही. मात्र लहान मुलांसाठी किंवा ज्येष्ठांसाठीही अनेकदा एखादी भाजी कमी तिखटाची करायची असते. अशावेळी व्हाईट ग्रेव्हीचा पर्याय अगदी उत्तम ठरतो. आता व्हाईट ग्रेव्ही झटपट आणि परफेक्ट कशी करायची असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया आपल्याला त्याची सोपी रेसिपी सांगत आहेत (How To Make Perfect Tasty White Gravy at Home). 

(Image : Google)

साहित्य -

1. कांदा - ४ ते ५ मध्यम आकाराचे कांदे

2. काजू - १० ते १२  

3. मिरची - २ 

4. आलं लसूण पेस्ट - १ मोठा चमचा

5. मगज बी - २५ ते ३०

6. मीठ - चवीनुसार 

7. वेलची पूड - अर्धा चमचा

8. पांढरी मिरपूड - अर्धा चमचा 

(Image : Google)

कृती -

१. कांदा आणि मिरची पातळ उभा चिरुन घ्यायचा.

. गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये कांदा आणि मिरची घालून त्यामध्ये बसेल इतके पाणी घालायचे.

३. याच पाण्यात काजू, मगज बी आणि आलं-लसूण पेस्ट घालून सगळे झाकण ठेवून २० मिनीटे चांगले शिजवायचे.

४. हे मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करुन घ्यायचे. 

५. पॅनमध्ये २ चमचे तेल घालून त्यामध्ये जीरे घालून ते चांगले तडतडू द्यायचे. 

६. त्यामध्ये तयार झालेली ग्रेव्ही आणि २ चमचे दही घालून सगळे एकजीव करायचे. 

७. यामध्ये मीठ आणि पांढऱ्या मीऱ्याच पावडरी, वेलची पूड घालून सगळे एकजीव करायचे. 

८. या ग्रेव्हीमध्ये आपण आपल्या आवडीची कोणतीही भाजी करु शकता. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.