दररोज ताजं दही खाणं हे आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे, हे आपण जाणतोच. शिवाय दह्याची जोड दिली की इतर पदार्थांची चवही आणखी खुलते. त्यामुळे दररोज घरात थोडं का होईना पण दही लागतंच. आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टर विकतच्या दह्यापेक्षा घरचं दही खा, असा सल्ला नेहमीच देतात. पण विकतसारखं घट्ट- गोड दही घरी होतच नाही. घरच्या दह्याला पाणीच खूप सुटलेलं असतं. त्यामुळे मग असं पाणीदार दही खाणं अनेकांना आवडत नाही. त्यामुळे मग बऱ्याच जणी घरी दही लावणंच सोडून देतात. तुमचंही असंच होत असेल तर एकदा पुढे सांगितलेल्या पद्धतीने दही लावून पाहा. अगदी विकतसारखं घट्ट आणि गोड दही घरी तयार होईल... (4 important tips while making thick curd or dahi at home)
घरी लावलेलं दही घट्ट आणि गोड हाेण्यासाठी उपाय
१. घरी दही लावण्यासाठी आपण जे दूध वापरतो ते एकदा उकळून, थंड करून त्याची साय काढून घेतलेली असते. पण पुन्हा जेव्हा आपण हे दूध दही लावण्यासाठी तापवतो, तेव्हा ते नुसतं कोमट करू नका.
तर ६ ते ८ मिनिटे चांगलं उकळून घ्या. यामुळे दूधात असणारा पाण्याचा अंश आणखी कमी होईल आणि दही घट्ट हाेण्यास मदत होईल.
२. यानंतर हे उकळवून घेतलेलं दूध कोमट होऊ द्या आणि नंतरच ते दही लावण्यासाठी वापरा.
३. बऱ्याचदा आपण आधी दूध पातेल्यात काढून घेतो आणि मग त्यात विरजण घालून दही लावतो. पण यापेक्षा थोडी वेगळी पद्धत वापरून पाहा. ज्या पातेल्यात दही लावायचं आहे, त्यात आधी थोडं विरजण घाला आणि ते पातेल्याच्या सगळ्या बाजुने एकसारखं लावून घ्या. यानंतर त्यात कोमट दूध ओता आणि मग पुन्हा एखादा मिनिट सगळं दूध हलवून घ्या.
तळपायाला भेगा पडल्या? टुथपेस्टमध्ये २ पदार्थ घालून करा उपाय, तळपाय होतील स्वच्छ- मुलायम
४. आता ज्या भांड्यात दही लावलं आहे ते उबदार ठिकाणी ठेवून द्या. हे भांडं वारंवार हलवू नये, तसेच त्याच्यावरचं झाकणही सारखं उघडून पाहू नये.
चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स घालविणारे ५ नॅचरल स्क्रब
५ ते ६ तासाने दूध विरजलं की ते एखादा तास सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. यानंतर जे दही भांड्यात तयार होईल, ते अगदी घट्ट झालेलं असेल शिवाय मुळीच आंबट नसेल.