Join us  

चहाच्या टपरीवर मिळतो तसा 'उकाळा' करण्याची फक्कड रेसिपी, प्या आणि व्हा फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 11:15 AM

How to Make Perfect Ukala at Home, Note down Recipe पावसाळ्यात प्यायलाच हवा गरमागरम उकाळा - दिवस जाईल एकदम फ्रेश

सकाळी - सकाळी प्रत्येकाला चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. काही फिटनेस फ्रिक लोकं ग्रीन - टी किंवा कोमट पाण्यात मध आणि लिंबू घालून पितात. आवडीनुसार लोकं आपले पेय निवडतात, त्यानंतर न्याहारी करतात. कॉफी आणि चहा तर आपण नेहमीच पितो. पण जर आपल्याला हे पेय पिऊन कंटाळा आला असेल, किंवा डिफरेंट काहीतरी ट्राय करायचं असेल तर, उकाळा ट्राय करून पाहा.

उकाळा म्हणजे थोडंसं घट्ट उकळलेलं दुध, त्यात सुकामेवा, यासह इतर जिन्नस मिसळले जातात. चहाच्या टपरीवर उकाळा मिळतो. पहिल्या घोटानंतर याची चव जिभेवर छान रेंगाळते, ज्यामुळे आपली सकाळ एकदम फ्रेश होते. आरोग्यासाठी गुणकारी आणि चवीलाही मस्त, असा हा उकाळा कसा तयार करायचा पाहूयात(How to Make Perfect Ukala at Home, Note down Recipe).

उकाळा करण्यासाठी लागणारं साहित्य

दूध

पाणी

हळद

बडीशेप

लवंग

काळी मिरी

न वाफवता करा खमंग खुसखुशीत को‌थिंबीर वडी फक्त १५ मिनिटांत

चक्रफुल

वेलची

जायफळ

चारोळी

सुंठ पावडर

गुळ पावडर

कृती

सर्वप्रथम, चहाच्या भांड्यात एक कप पाणी आणि २ कप दूध घाला, नंतर त्यात एक चमचा हळद घालून मिक्स करा. मिक्सरच्या भांड्यात एक चमचा बडीशेप, २ ते ३ लवंग, ३ ते ४ काळी मिरी, २ चक्रफुल, ३ ते ४ वेलची, जायफळ घालून चहा मसाला तयार करा. व चवीनुसार हा चहा मसाला उकळत्या दुधात घालून मिक्स करा. या मसाल्यामुळे उकाळ्याची चव वाढेल.

कुरडईची भाजी नूडल्सहून भारी, करुन पाहा पारंपरिक झणझणीत आणि चविष्ट कांदा-कुरडई!

नंतर त्यात एक चमचा चारोळी, वेलची, आणि सुंठीची पूड घालून मिक्स करा. गोडव्यासाठी आपण त्यात साखरेऐवजी २ चमचे गुळ पावडर घालू शकता. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. व तयार उकाळा एका ग्लासमध्ये काढून सर्व्ह करा. अशा प्रकारे गरमागरम उकाळा रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स