Lokmat Sakhi >Food > पेरी -पेरी मखाणा मिक्स - सायंकाळी खा, वजनही वाढणार नाही आणि चटकमटक खाताही येईल !

पेरी -पेरी मखाणा मिक्स - सायंकाळी खा, वजनही वाढणार नाही आणि चटकमटक खाताही येईल !

Peri Peri Makahana Mix Recipe : संध्याकाळच्या चहासोबत वेफर्स, बिस्किट्स, कचोरी, फरसाण असे तेलकट मसालेदार पदार्थ खाण्यापेक्षा, मखाण्यांचा पौष्टिक चिवडा केव्हाव्ही उत्तम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2023 09:52 AM2023-09-03T09:52:33+5:302023-09-03T10:06:14+5:30

Peri Peri Makahana Mix Recipe : संध्याकाळच्या चहासोबत वेफर्स, बिस्किट्स, कचोरी, फरसाण असे तेलकट मसालेदार पदार्थ खाण्यापेक्षा, मखाण्यांचा पौष्टिक चिवडा केव्हाव्ही उत्तम...

How To Make Peri Peri Makahana Mix Recipe At Home. | पेरी -पेरी मखाणा मिक्स - सायंकाळी खा, वजनही वाढणार नाही आणि चटकमटक खाताही येईल !

पेरी -पेरी मखाणा मिक्स - सायंकाळी खा, वजनही वाढणार नाही आणि चटकमटक खाताही येईल !

आपण दुपारी कितीही पोटभर जेवलो असलो तरीही आपल्याला संध्याकाळी चहाच्या वेळी छोटी भूक लागतेच. चहाच्यावेळी लागणाऱ्या अशा छोट्या भुकेसाठी आपण काहीच खाल्ले नाही तर ही छोटी भूक आपल्याला वारंवार सतावते. अशा छोट्या भुकेसाठी आपण वेफर्स, बिस्कीट असे पॅकेजिंग केलेले पदार्थ खातो. परंतु असे पॅकेजिंग केलेलं पदार्थ वारंवार खाणे आपल्या शरीरासाठी व आरोग्यासाठी अपायकारक ठरु शकतात. यासाठी चहाच्यावेळी लागणाऱ्या अशा छोट्या भुकेच्यावेळी आपण ड्रायफ्रुट्स, फळ, चणे - शेंगदाणे, घरगुती चिवडा असे पौष्टिक पदार्थ देखील खाऊ शकतो. 

सध्या सगळेच आपल्या हेल्थ बाबतीत खूपच सजग झाले आहेत. त्यामुळे आपल्यापैकी बरेचसे लोक चहाच्यावेळी लागणाऱ्या छोट्या भुकेच्यावेळी वेफर्स, बिस्किट्स, कचोरी, फरसाण असे तेलकट मसालेदार पदार्थ खाणे टाळतात. मग या संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी नेमकं खायचं तरी काय असा प्रश्न पडतो? काहीच खाल्ले नाही तर भुकेने जीव कासावीस होतो. अशावेळी आपण घरगुती हेल्दी मखाणे (Healthy Makhana) बदाम, शेंगदाणे असे इतर काही जिन्नस वापरून मखाण्यांचा पौष्टिक पेरी - पेरी मखाणा मिक्स बनवून खाऊ शकतो. हा चिवडा घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात झटपट बनवून होतो. हा हलका - फुलका पौष्टिक (Peri Peri Makhana) चिवडा खाल्ल्याने भूकही भागेल व बाहेरचे तेलकट, मसालेदार पॅकेजिंग फूड खाण्याचा प्रश्नच येणार नाही(How To Make Peri Peri Makahana Mix Recipe).

साहित्य :- 

१. साजूक तूप - २ टेबलस्पून 
२. बदाम - १ कप 
३. शेंगदाणे - १ कप 
४. भोपळ्याच्या बिया - १/२ कप 
५. मगज बिया - १/२ कप 
६. काश्मिरी लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून 
७. मीठ - चवीनुसार 
८. मखाणे - ३ कप
९. पेरी पेरी मसाला - १ टेबलस्पून   

उरलेले पनीर फ्रिजमध्ये ठेवले तरी लगेच शिळे - पिवळे दिसते, १ सोपी ट्रिक- पनीर राहील ताजे फ्रेश!


श्रावण स्पेशल : नेहमीची मऊ भगर खाऊन कंटाळा आला असेल तर करा 'भगर पुलाव', वरीच्या तांदळाचा चविष्ट पदार्थ...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या कढईमध्ये साजूक तूप घेऊन ते मंद आचेवर हलकेसे गरम करून घ्यावे. 
२. आता त्यात मखाणे, बदाम, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया, मगज बिया घालून ५ ते ७ मिनिटे परतून घ्यावे. 
३. सगळे जिन्नस भाजून व्यवस्थित कुरकुरीत झाल्यास हे एका मोठ्या डिशमध्ये काढून बाजूला ठेवावे.

मोड आलेली कच्ची उसळ चिकट होते, आंबूस वास येतो ? १ भन्नाट ट्रिक, उसळ राहील फ्रेश...

 

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यात फरक काय असतो ? ओळखायचे कसे, चुकून भलतेच वापरले तर...

४. त्यानंतर कढईमध्ये थोडे साजूक तूप घालून त्यात काश्मिरी लाल मिरची पावडर, पेरी पेरी मसाला व चवीनुसार मीठ घालून घ्यावे. 
५. आता या मसाल्यात भाजून घेतलेले मखाणे व इतर जिन्नस घालून त्याला व्यवस्थित मसाला लागेपर्यंत चमच्याने ढवळून घ्यावे. 

उरलेला शिळा ब्रेड ताजा करण्याची १ जादूई ट्रिक, शेफ पंकज भदौरिया सांगतात...


पेरी - पेरी मखाणा मिक्स खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: How To Make Peri Peri Makahana Mix Recipe At Home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.