वांग्याचं भरीत आपण नेहमीच करतो. किंवा पेरुची चटणीही बऱ्याचदा केली जाते. पण आता मात्र एक वेगळंच कॉम्बिनेशन आपण पाहणार आहोत. यामध्ये चक्क पेरुचं भरीत कसं करतात ते दाखवण्यात आलं आहे. त्याला पेरुची चटणी (guava chutney recipe in marathi) असं त्या व्हिडिओमध्ये म्हटलं गेलं आहे. पण ज्याप्रमाणे आपण भरीत करण्यासाठी वांगं भाजतो, त्याचप्रमाणे इथे पेरू भाजला आहे. त्यामुळे त्या रेसिपीला पेरूचं भरीत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही (How to make peru bharit in marathi). आता हे पेरूचं भरीत कसं करायचं ते पाहूया. (guava bharata recipe)
पेरूचं भरीत करण्याची रेसिपी
पेरूचं भरीत किंवा चटणी कशी करायची याची रेसिपी indiakatadkaa या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
साहित्य
१ मध्यम आकाराचा पेरू
३ ते ४ हिरव्या मिरच्या
झाडांना हिरवंगार बनविणारं 'मॅजिक वॉटर'! पानं पिवळी पडत असतील तर करा 'हा' सोपा उपाय
६ ते ७ लसूण पाकळ्या
आल्याचा एक छोटासा तुकडा
२ ते ३ टेबलस्पून कोथिंबीर
चवीनुसार मीठ
रेसिपी
१. सगळ्यात आधी वांग्यासाठी भरीत भाजतो, त्याप्रमाणे पेरू भाजून घ्या. पेरू भाजण्यापुर्वी त्याला थोडंसं कापा आणि त्याच्यामध्ये एखादी लसूण पाकळी आणि एक मिरची टाका.
२. यानंतर पेरू थंड झाला की त्याचे सालं काढून घ्या.
मुलांनी पेन्सिलीने, रंगांनी लिहून खराब केलेली भिंत होईल चकाचक, फक्त 'हा' १ पदार्थ लावा..
३. पेरूच्या लहान फोडी कापा. आता मिक्सरच्या भांड्यात पेरूच्या फोडी, लसूण, मिरच्या, कोथिंबीर, आलं टाका आणि मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्या.
४. आता ही पेस्ट एका वाटीत काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घाला. ही झाली पेरूची चटणी तयार. या चटणीला हिंग, जिरे, मोहरी घालून फोडणीही देऊ शकता. आणखी चवदार लागेल.