Lokmat Sakhi >Food > मीठ लावून पेरू नेहमीच खाता, यावेळी करून पाहा खट्टा- मिठा पेरू शॉट- बघा चटपटीत रेसिपी 

मीठ लावून पेरू नेहमीच खाता, यावेळी करून पाहा खट्टा- मिठा पेरू शॉट- बघा चटपटीत रेसिपी 

Food And Recipe: यावर्षीच्या पेरुच्या सिझनमध्ये खट्टा- मिठा पेरू शॉट तर झालाच पाहिजे.... चव इतकी चटपटीत आहे की खाऊन पाहताच सगळ्यांना आवडेल (How to make peru shot or Guava shot at home?).

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2023 03:55 PM2023-11-27T15:55:39+5:302023-11-27T15:56:19+5:30

Food And Recipe: यावर्षीच्या पेरुच्या सिझनमध्ये खट्टा- मिठा पेरू शॉट तर झालाच पाहिजे.... चव इतकी चटपटीत आहे की खाऊन पाहताच सगळ्यांना आवडेल (How to make peru shot or Guava shot at home?).

How to make peru shot or Guava shot at home? guava shot recipe, tasty yummy guava shot | मीठ लावून पेरू नेहमीच खाता, यावेळी करून पाहा खट्टा- मिठा पेरू शॉट- बघा चटपटीत रेसिपी 

मीठ लावून पेरू नेहमीच खाता, यावेळी करून पाहा खट्टा- मिठा पेरू शॉट- बघा चटपटीत रेसिपी 

Highlightsचव एवढी चटपटीत आहे की लहानांपासून- मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच 'पेरू शॉट' किंवा 'गवा शॉट' आवडेल

बाजारात आता हिरवेगार, थोडेसे पिवळसर झालेले असे वेगवेगळे पेरू दिसू लागले आहेत. पेरुच्या गाड्यांनी बाजारपेठ, रस्त्यालगतचे रस्ते छान सजलेले आहेत. असे छानपैकी रचून ठेवलेले पेरू पाहिले की ते खाण्याचा मोह आवरत नाही. पेरू खाण्याचा मोह होत असेल तर तो आवरूही नये. कारण पेरु अतिशय पौष्टिक असतात. आता पेरुच्या फोडीवर थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट टाकून तर आपण नेहमीच खातो. आता यावेळी तशी नुसतीच पेरुची फोड न खाता त्याचा छानपैकी 'पेरू शॉट' किंवा 'गवा शॉट' करा (How to make peru shot or Guava shot at home?)... चव एवढी चटपटीत आहे की लहानांपासून- मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तो आवडेल (chili guava shot recipe). चटपटीत चवीचा खट्टा- मिठा पेरु शॉट कसा करायचा, ते आता पाहूया (guava shot recipe)...

 

पेरू शॉट करण्याची रेसिपी

ही रेसिपी satvicmovement या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

३ मध्यम आकाराचे पेरू

केसांतून नुसता हात फिरवला तरी केस गळून येतात? 'ही' पावडर खाऊन बघा- १५ दिवसांत केस गळणं कमी 

हिरवी मिरची

जिरे पूड

काळे मीठ

कृती

पेरुचे देठ असते त्याच्या खाली साधारणपणे १ इंच एवढ्या अंतरावर पेरू कापून घ्या.

आता चाकू किंवा चमचा वापरून पेरुच्या आतला गर काढून घ्या.

 

पेरुचा गर, हिरव्या मिरचीचा एक छोटासा तुकडा, अर्धा टीस्पून जिरेपूड, अर्धा टिस्पून काळे मीठ आणि एक तृतीयांश कप पाणी असं सगळं मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्याचा रस करून घ्या. 

आता गर काढलेल्या पेरुमध्ये हा रस टाका. त्याच्यावर डाळिंबाचे दाणे, पुदिना असं टाकून तो सर्व्ह करा. चटपटीत पेरू शॉट तयार.

झाडाची पानं सुकली- सारखी गळतात? २ पदार्थ वापरून घरीच तयार करा औषध- झाडं होतील हिरवीगार

पेरू शॉट करताना असे बदलही करू शकता...

पेरू शॉट करताना तुम्ही त्यामध्ये थोडी साखरही टाकू शकता. 

हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखटही टाकू शकता. 

पेरुचा गर मिक्सरमधून काढताना त्यात थोडा पुदिना टाकला तरी खूप छान चव येते.

पेरुचा गर मिक्सरमधून काढताना पाण्याऐवजी बर्फाचे तुकडे टाकले तरी पेरु शॉटला आणखी वेगळी चव येऊ शकते.

 

Web Title: How to make peru shot or Guava shot at home? guava shot recipe, tasty yummy guava shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.