पावसाळा आला की शक्यतो आपल्याला पालेभाज्या खाऊ नये असा सल्ला दिला जातो. त्यामुळे पालेभाज्या न खाता आपल्यापैकी बरेचजण रानभाज्या खाण्याला पसंती दाखवतात. या रानभाज्या वर्षभर उपलब्ध न होता केवळ पावसाळ्याच्या ऋतूंमध्येच खायला मिळतात. पावसाळा आणि रानभाज्या यांचे एक अतूट नाते आहे असेच म्हणावे लागेल. कित्येकदा आपल्याला या रानभाज्यांची नावे आणि फायदे माहित नसतात. त्याचबरोबर आपल्याला माहित असलेल्या पालेभाज्यांपेक्षा रानभाज्यांची चव थोडी वेगळी असल्यामुळे अनेकजण खाण्यासाठी नाक मुरडतात.
पावसाळ्यात कंटोळी, टाकळा, काटेमाठ, फोडशी अशा अनेक प्रकारच्या रानभाज्या बरेचजण आवडीने खातात. या रानभाज्या वर्षभरातून एकदाच मिळत असल्या तरीही त्या आरोग्याच्या दृष्टीने फारच पौष्टिक असतात. या रानभाज्यांचे गुणकारी फायदे अनेक असले तरीही काहीवेळा त्यांच्या चवीमुळे आपण या भाज्या खाण्यास नकार देतो. या भाज्यांचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनवता येऊ शकतात. या भाज्यांचे पौष्टिक गुण आपल्या पोटात जावे यासाठी भाजी खाल्ली जात नसेल तर त्याची भजी किंवा वड्या तयार केल्या जाऊ शकतात. या भाज्यांचा वापर करून तयार केलेल्या वड्या व भजी घरातले सगळेच चुटकीसरशी फस्त करतील(How To Make Phodshichi Bhaji Recipe At Home In Just 10 Minutes).
साहित्य :-
१. फोडशीच्या भाजीची जुडी - १ (पाने काढून बारीक चिरून घेतलेली)
२. हिरव्या मिरच्या - २ ते ३ (बारीक चिरलेल्या)
३. धणे - जिरे पूड - १ टेबलस्पून
४. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
५. हळद - १/२ टेबलस्पून
६. मीठ - चवीनुसार
७. तांदुळाचे पीठ - १/२ कप
८. बेसन - २ कप
९. तेल - २ टेबलस्पून
१०. पाणी - गरजेनुसार
११. ओवा - १/२ टेबलस्पून
१२. पांढरे तीळ - १ टेबलस्पून
१३. जिरे - १ टेबलस्पून
१४. हिंग - १/४ टेबल्स्पून
१५. तेल - ४ ते ५ टेबलस्पून (तळण्यासाठी)
घरच्याघरी करा परफेक्ट ढोकळा प्रिमिक्स, १० मिनिटांत लुसलुशीत ढोकळा तयार ! पीठ टिकते ६ महिने...
फक्त १० मिनिटांत घरीच करा हलका-जाळीदार ढोकळा, मिश्रण न फेटता, न आंबवता करा ढोकळा...
कृती :-
१. सर्वप्रथम फोडशीची भाजी स्वच्छ धुवून त्याची पाने वेगळी काढून ती बारीक चिरून घ्यावीत.
२. ही बारीक चिरलेली पाने एका बाऊलमध्ये घेऊन त्यात लाल तिखट मसाला, धणे - जिरे पूड, हळद, मीठ चवीनुसार, तांदुळाचे पीठ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात. हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यावेत.
३. आता या तयार मिश्रणात बेसन घालून घ्यावे. त्यानंतर गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालून भाजीचे मिश्रण तयार करून घ्यावे.
४. त्यानंतर एका छोट्या भांड्यात तेल घेऊन ओवा, पांढरे तीळ, जिरे, चिमूटभर हिंग घालून खमंग फोडणी तयार करून घ्यावी.
घरच्याघरी १० मिनिटांत चहा मसाला करण्याची सोपी कृती, पावसाळ्यात ‘मसाला चाय’ प्या मनसोक्त...
गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!
५. ही तयार फोडणी भजीच्या भिजवलेल्या मिश्रणात ओतून घ्यावी.
६. आता चमच्याच्या मदतीने ही फोडणी व भजीचे मिश्रण ढवळून एकजीव करून घ्यावे.
७. एका बाजूला कढईमध्ये तेल तापत ठेवावे. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात या फोडशीच्या भज्या एक एक करून सोडून घ्याव्यात.
८. फोडशीची भजी हलका गोल्डन रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यावी.
नेहमीच भाजीत भाजी मेथीची कशाला; करुन पाहा मेथीची खमंग-खुसखुशीत वडी- भूक वाढवणारा पदार्थ..
विरजण न लावता १० मिनिटांत घरी दही करण्याची भन्नाट ट्रिक...
आपली फोडशीची गरमागरम भजी खाण्यासाठी तयार आहे. ही भजी हिरवी चटणी किंवा सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावी.