Join us  

फुलका फुगतच नाही- वातड होतो? बघा नेमकं कुठे चुकतं, ५ टिप्स, भरभर करा मस्त फुगलेले फुलके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2023 2:48 PM

5 Tips For Making Perfect Puffy Phulka: फुलका फुगत नसेल तर नक्कीच आपलं काहीतरी चुकतंय. ते नेमकं काय ते आता पाहूया...

ठळक मुद्देफुलके करताना ते टम्म फुगावेत आणि मऊ राहावेत, यासाठी या काही गोष्टी लक्षात ठेवाव्या

हल्ली बरेच जण आरोग्याच्या बाबतीत खूप सतर्क झाले आहेत. त्यामुळे मग पोळीच्या ऐवजी ते फुलका खाणं पसंत करतात. कारण तुलनेने पोळीपेक्षा फुलके करायला कमी तेल लागतं. पण फुलके करताना अनेकदा अशी अडचण होते की फुलका आपल्याला पाहिजे तसा फुगतच नाही (How to make phulka?). फुलका चांगला फुगला नाही, तर मग तो वातड होतो (How to make phulka puff up?). असा फुलका मग खावा वाटत नाही. म्हणूनच फुलके करताना ते टम्म फुगावेत आणि मऊ राहावेत, यासाठी या काही गोष्टी लक्षात ठेवाव्या (5 Tips for making perfect puffy phulka). 

 

फुलका का फुगत नाही?

१. फुलका न फुगण्याची जी काही कारणं आहेत त्यापैकी पहिलं कारण म्हणजे कणिक व्यवस्थित न मळणे. बऱ्याचजणी कणिक भिजवतात पण ती व्यवस्थित मळत नाहीत. पोळी असो किंवा फुलका असो, त्यासाठी कणिक जर व्यवस्थित मळली गेली तरच ते फुगतात. त्यामुळे ५ ते ७ मिनिटे कणिक चांगली मळून घ्या. 

शाकाहारी असलेला विराट कोहली प्रोटीनसाठी सध्या काय खातो? कुठून येते त्याच्यात एवढी ताकद?

२. कणिक मळल्यानंतर लगेचच फुलका करायला घेऊ नये. कणिक १० ते १५ मिनिटे नीट भिजू द्यावी. झाकण कुठेही उघडं राहणार नाही आणि कणिक कोरडी पडणार नाही, याची काळजी घ्यावी. 

१० मिनिटांत करा क्रिस्पी- क्रंची पनीर कुरकुरे... कुणाल कपूर यांची खास रेसिपी- एकदा खाऊन बघाच

३. तिसरी गोष्ट म्हणजे आपण पोळी लाटताना भराभर, दाब देऊन लाटतो. फुलक्याच्या बाबतीत तसं करू नये. फुलका हलक्या हाताने सगळीकडे समान पसरला जाईल, अशा पद्धतीने लाटावा.

 

४. चौथी गोष्ट म्हणजे फुलक्यासाठी कणकेचा गोळा खूप लहान किंवा मोठा घेऊ नये. जर लहान गोळा घेऊन मोठा फुलका लाटायला गेलात, तर तो जास्त पातळ होतो. त्यामुळे मग फुगत नाही आणि वातड होतो. त्यामुळे साधारण पुरी करताना जेवढा कणकेचा उंडा घेतो तेवढा घ्यावा आणि त्या उंड्याचा पुरीपेक्षा मोठ्या आकाराचा पण पोळीपेक्षा लहान आकाराचा फुलका लाटावा.

बघा छोट्याशा कुंडीत कशी लावायची कोथिंबीर, एकदम सोपी पद्धत- रोजच खाता येईल घरची ताजी कोथिंबीर

५. फुलका लाटताना जी बाजू वर होती, ती बाजू फुलका भाजताना तव्यावर टाकावी. ती बाजू खूप भाजू नये. थोडी कच्ची- पक्की झाली की लगेच फुलका उलटवा आणि दुसरी बाजू मात्र पुर्णपणे भाजून घ्या. त्यानंतर जी बाजू कमी भाजलेली आहे, ती बाजू थेट गॅसवर टाकावी. अशावेळी गॅस मध्यम आचेवर असावा. खूप मोठा किंवा खूप लहान नकाे. अशाप्रकारे केलेला फुलका बघा कसा टम्म फुगतो.. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.