Join us  

नुसतं अननस तर नेहमीच खातो, आता अननसाची आंबट- गोड चटपटीत चटणी खाऊन पाहा, कुणाल कपूर यांची स्पेशल रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2023 3:08 PM

Kunal Kapoor's Special Recipe Of Pineapple Chutney: अननसाची चटणी कधी खाऊन पाहिली का? एकदा खाऊन बघायलाच पाहिजे अशी ही चटपटीत चटकदार चटणी. घ्या खास रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलेली......

ठळक मुद्दे जेवणात तोंडी लावायलाही अतिशय टेस्टी. ही चटणी कैरीच्या आंबट- गोड चटणीची आठवण देऊन जाते.

अननस बाजारातून विकत आणलं की ते आपण चिरून खातो. बऱ्याचदा काहीतरी वेगळं म्हणून अननसाचा ज्यूस करून पितो. काही वेळेला फ्रुट सलाड करताना त्यात अननस टाकतो. पण अननसाची चटणी हा प्रयोग मात्र फार कुणी कधी केलेला नसावा. पण एखादा आवर्जून करून खायलाच हवा, असा हा चटपटीत पदार्थ आहे. अननसाची अतिशय चवदार चटणी कशी करायची (How to make pineapple chutney?), याविषयीची माहिती सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केली आहे. रेसिपी अतिशय सोपी आहे. शिवाय कमी वेळेत होणारी. पराठा, पोळी यासोबत लावून खायला ही चटणी छानच आहे. शिवाय जेवणात तोंडी लावायलाही अतिशय टेस्टी. ही चटणी कैरीच्या आंबट- गोड चटणीची आठवण देऊन जाते. ( Easy and quick recipe of pineapple chutney by chef Kunal Kapoor)

 

अननस चटणी रेसिपी (pineapple chutney recipe)

साहित्य

१ मोठे अननस

अर्धी वाटी साखर

गरबा खेळायला जाणार असाल तर फक्त २५० रुपयांची ही किट आधी विकत घ्या! ऐनवेळी गडबड होणारच नाही..

२ टी स्पून जीरे

१ टीस्पून मीरेपूड

१ टीस्पून तेल

चवीनुसार मीठ आणि तिखट

 

कृती

१. सगळ्यात आधी तर अननस गॅसवर ठेवा आणि त्याच्या सालीसकट भाजून घ्या. वांग्याचं भरीत करताना आपण वांगं जसं भाजतो, तसं अननस भाजून घ्यावं. त्याचा वरचा भाग भाजून काळा झाला की अननस खरपूस भाजल्या गेलं आहे, हे समजावं.

२. त्यानंतर ते थंड होऊ द्या. थंड झाल्यावर चाकूने चिरून त्याचे वरचे आवरण काढून टाका.

फर्निचरला वाळवी लागू नये म्हणून २ सोपे उपाय, वर्षानुवर्षे टिकेल फर्निचर, राहील अगदी नव्यासारखं

३. आता अननसाचे बारिक काप करा. गॅसवर कढई तापायला ठेवा.

४. कढईमध्ये अननसाचे बारीक काप आणि साखर टाकून दोन्ही एकत्रित परतून घ्या.

५. त्यानंतर अननस ५ ते १० मिनिटे परतलं की त्यात जीरे किंवा जीरेपूड, मीरेपूड टाका आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण हलवून घ्या. गॅस बंद करा.

२ प्रकारचे पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम करणं म्हणजे कॅन्सरला आमंत्रण, बघा मायक्रोवेव्ह कोणत्या पदार्थांसाठी वापरावा

६. हे मिश्रण थंड झालं की ते मिक्सरमधून फिरवून त्याची चटणी करून घ्या. वरतून तुम्हाला हवं तसं चवीनुसार लाल तिखट टाका.

७. अननसाची चटपटीत चटणी झाली तयार...

 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती