Join us  

नवरात्रीचा उपवास सोडताना करा 'अननसाचा शीरा'; मऊ, चविष्ट नैवेद्य झटपट बनेल-सोपी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 1:40 PM

How to Make Pineapple Sheera : बाजारात ताजे अननस दिसायला सुरूवात झाली आहे. पायनॅप्पल शीरा सोप्या स्टेप्सचा वापरून घरीच करू शकता.

नैवेद्यासाठी (Navratri) किंवा उपवास सोडताना ताटात ठेवण्यासाठी  काय नवीन बनवावं हे सुचत नाही. पुरणपोळी, खीर, शीरा हे पदार्थ नेहमीच केले जातात. त्यातल्या त्यात काही वेगळा पदार्थ बनवायचा झाला तर तुम्ही सिजनल फ्रुट्सचा वापर करू सकता. बाजारात ताजे अननस दिसायला सुरूवात झाली आहे. पायनॅप्पल शीरा सोप्या स्टेप्सचा वापरून घरीच करू शकता. (How to Make Pineapple Sheera)

अननसाचा शीरा बनवण्याची कृती (Pineapple sheera making step's)

१) पायनॅप्पल शिरा बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईत तूप घालून त्यात बदाम तळून घ्या. बदाम तळून झाल्यानंतर त्यात काजू तळून घ्या. यात मनुकेसुद्धा १ मिनिटासाठी फ्राय करून घ्या. 

२) ड्रायफ्रुट्स तळून झाल्यानंतर कढईत अजून तूप घाला आणि त्यात रवा भाजून घ्या. ४ ते ५ मिनिटं रवा मिडियम ते मंद आचवर भाजून घ्या. रव्याचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. रवा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याचा सुवास यायला सुरूवात होईल. रवा उच्च आचेवर गरम करू नका. कारण यामुळे रवा करपू शकतो.

३) कढईतून भाजलेला रवा एका भांड्यात काढून घ्या. नंतर कढईत परत तूप घाला. त्यात अननसाचे बारीक केलेले काप घाला. अननस छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापले असतील तर ते लगेच शिजतील. अननस तुपात भाजताना त्यात साखर घालायला विसरू नका. 

१ वाटी साबुदाणाचा पटकन बनेल खमंग नाश्ता; उपवासाची एकदम सोपी, नवी रेसिपी-चवीला भारी

४) यामुळे साखर कॅरेमलाईज्ड होऊन चांगला फ्लेवर आणि रंग येईल. अननस व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यात २ ते ३ कप पाणी घाला. पाण्यात केसर आणि चिमूटभर हळद घाला. पाण्याला उकळ आल्यानंतर त्यात भाजलेला रवा घाला.

५) रवा घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने सतत ढवळत राहा. जर तुम्ही व्यवस्थित ढवळलं नाही तर त्यात गुठळ्या पडू शकतात. २ मिनिटांनतर तुम्हाल दिसेल की रव्याने पाणी शोषून घेतलं असेल. तीन ते चार कप पाणी घालून रवा व्यवस्थित एकजीव करून घ्या. 

मऊ, जाळीदार उपवासाचा ढोकळा घरीच करा; २ जिन्नस वापरून बनेल चविष्ट नाश्ता-सोपी रेसिपी

६) तुम्हाला अजून गोड शीरा हवा असेल तर तुम्ही त्यात अजून साखर घालू शकता. अननस गोड आहे की आंबट यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करा. आता शिऱ्यात ड्रायफ्रुट्स आणि उरलेलं १ ते २ चमचा तूप घाला. शेवटी वेलची पावडर घालून रवा एकजीव करा. त्यानंतर  चमच्याने पुन्हा शीरा वर खाली करून गॅस बंद करा. तयार आहे गरमागरम पायनॅप्पल शीरा.

 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सनवरात्री गरबा २०२३शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री