Join us  

गव्हाच्या पिठाचा चवदार पिझ्झा- मुलांना डब्यातही देता येईल, मैद्याचा विकतचा पिझ्झा नकोच- बघा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2023 2:31 PM

Wheat Aata Pizza Recipe: मैद्याचा पिझ्झा खाऊन पोट आणि तब्येत बिघडण्यापेक्षा कणकेचा म्हणजेच गव्हाच्या पिठाचा पिझ्झा घरच्याघरी कसा करायचा, ते पाहा...(Gehu ke aate ka Homemade healthy pizza)

ठळक मुद्देमुलांना डब्यातही काहीतरी वेगळं पाहिजेच असतं. अशावेळी मुलांना डब्यात देण्यासाठीही हा पदार्थ चांगला आहे.

पिझ्झा हा बहुतांश लहान मुलांचा अतिशय आवडीचा पदार्थ. महिन्यातून एकदा तरी मुलं पिझ्झा खातातच. काही काही मुलं तर महिन्यातून २- ३ वेळाही पिझ्झा खातात. मोठ्या मंडळींनाही बऱ्याचदा चवीत बदल म्हणून पिझ्झा खावा वाटतो. पण मैद्याचा पिझ्झा खाऊन पोट आणि तब्येत या दोन्ही गोष्टी बिघडवून घेण्यापेक्षा गव्हाच्या पिठाचा म्हणजेच कणकेचा पिझ्झा घरच्याघरी तयार करा (How to make pizza from wheat aata). यामुळे पिझ्झाच्या निमित्ताने मुलांच्या पोटात भरपूर भाज्याही जातील (Homemade healthy pizza- Gehu ke aate ka pizza). मुलांना डब्यातही काहीतरी वेगळं पाहिजेच असतं. अशावेळी मुलांना डब्यात देण्यासाठीही हा पदार्थ चांगला आहे.(How to make pizza more healthy?) 

 

गव्हाच्या पिठाचा म्हणजेच कणकेचा पिझ्झा करण्याची रेसिपी

ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या rakhisuniquefood या पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

साहित्य

१ कप कणिक

२ टीस्पून ओरिगॅनो

१ टीस्पून मीठ

'The Archies' च्या प्रिमियरला खुशी कपूरला पाहताच अनेकांना आठवली श्रीदेवी, बघा त्यामागचं इमोशनल कारण.... 

अर्धा टिस्पून बेकिंग पावडर

१/८ टीस्पून बेकिंग सोडा

टोमॅटो सॉस

पिझ्झा सॉस

 

चिली फ्लेक्स आवडीनुसार

२ ते ३ टेबलस्पून चीज

नाचतानाही आराध्याला पकडूनच ठेवत होती ऐश्वर्या, व्हिडिओ पाहून नेटिझन्स म्हणाले अगं आता तरी तिला.....

टॉपिंगसाठी सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, स्वीटकॉर्न या भाज्या

२ टेबलस्पून दही

१ टेबलस्पून तेल 

 

कृती 

१. सगळ्यात आधी एका भांड्यात कणिक घ्या. नंतर त्यात ओरिगॅनो, मीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि दही घालून कणिक मळून घ्या. ही कणिक १५ ते २० मिनिटांसाठी झाकून ठेवा.

२. यानंतर पिझ्झाच्या टॉपिंग्ससाठी तुमच्या आवडीच्या भाज्या कापून घ्या.

फक्त १० रुपयांत घरच्याघरी तयार करा बाॅडीलोशन, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणारच नाही..

३. आता कणिक भिजवून १५ ते २० मिनिटे झाले असतील तर कणकेचा गोळा पुन्हा एकदा मळून घ्या आणि लाटण्याने किंवा हाताने तो एका ताटलीवर पसरवून घ्या.

४. यानंतर काट्या चमच्याचा वापर करून त्यावर छिद्रं करून घ्या. या बेसवर आता टोमॅटो सॉस, पिझ्झा सॉस लावा. त्यावर चीज आणि भाज्या टाका. आवडीनुसार चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाका. आता हा पिझ्झा बेस मायक्रोवेव्ह किंवा कढई- कुकर यांच्यामध्ये ठेवून बेक करून घ्या. गरमागरम पिझ्झा तयार.. 

 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.लहान मुलं