Join us  

कपभर पोहे-५ कप पाणी, दुप्पट फुलणारे पापड करा घरीच, वाळवण्यासाठी गच्चीवरही जाण्याची गरज नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2024 12:41 PM

How to make Poha Papad at Home : चवीला कुडुमकुडुम-बनवायला सोपी, झटपट तयार होतील असे पोह्याचे पळी पापड-पाहा कृती..

उन्हाळा असो किंवा पावसाळा जेवणासोबत आपण आवडीने पापड खातोच. उन्हाळा सुरु झाल्यानंतर प्रत्येक घरात पापड तयार करण्याची लगबग सुरु होते. वर्षभर पुरतील असे पापड तयार केले जातात. पण तयार केलेले पापड संपले असतील किंवा विकतचे आणण्यापेक्षा घरात पापड तयार करायचे असतील तर, पोह्याचे पळी पापड तयार करा. सध्या हिवाळा सुरु आहे. हिवाळ्यात पापड लवकर वाळत नाही (Poha Papad).

थंड वातावरणामुळे आपण पापड बनवणे टाळतो. पण पोह्याचे पळी पापड आपण घरीच कमी साहित्यात, शिवाय उन्हात वाळवण्यापेक्षा फॅन खाली वाळत घालू शकता (Cooking Tips). कपभर पोह्याचे पळी पापड कसे तयार करायचे पाहूयात(How to make Poha Papad at Home).

पोह्याचे पळी पापड करण्यासाठी लागणारं साहित्य

पोहे

पाणी

जिरं

चिली फ्लेक्स

मीठ

न थापता करा तांदळाची पातळ पौष्टिक भाकरी, १ ट्रिक- शिळी भाकरीही राहील मऊसुत

पापड खार

कृती

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात एक कप पोहे घ्या. त्याची पावडर तयार करा. नंतर त्यात २ कप पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. एका कढईत ३ कप पाणी घाला. त्या पाण्यात तयार केलेली पोह्याची पेस्ट घालून मिक्स करा.

आता कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. पेस्टला घट्टपणा आल्यानंतर त्यात अर्धा चमचा पापड खार, एक चमचा चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घालून चमच्याने मिक्स करत राहा. पेस्टला उकळी आल्यानंतर गॅसची आच कमी करा. नंतर त्यात एक चमचा जिरं घालून मिक्स करा, आणि गॅस बंद करा.

घावन करायला जावं तर ते तव्याला चिकटतं? उलटताना तुटतं? पाहा पारंपरिक कोकणी घावन रेसिपी

जमिनीवर प्लास्टिक पेपर टाका, त्यावर थोडे तेल लावा. मिश्रण थंड झाल्यानंतर पळीने घेऊन पेपरवर गोलाकार आकाराने मिश्रण ओता, फॅनखाली किंवा बाल्कनीमध्ये वाळवण्यासाठी ठेवा. पापड पूर्णपणे वाळल्यानंतर एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. अशा प्रकारे कपभर पोह्याचे पळी पापड खाण्यासाठी रेडी. पापड तेलात तळल्यास आकाराने दुपट्ट फुलतात. शिवाय महिनाभर टिकतात.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स