मस्त गरमागरम, पिवळे - पांढरे, खारट, तिखट अशा असंख्य चवीचे असणारे पॉपकॉर्न खायला कुणाला नाही आवडत. मस्त मुसळदार कोसळणाऱ्या पावसात, किंवा एखादा आवडीचा सिनेमा बघताना, मित्र - मैत्रिणींशी गप्पा टप्पा करताना याच्या जोडीला पॉपकॉर्न असतील तर अजून काय हवं... पॉपकॉर्न हा एक असा स्नॅक्सचा प्रकार आहे की तो जगभर अतिशय प्रसिद्ध आहे. पॉपकॉर्न(Popcorn Recipe at Home) म्हटलं की, मक्याचे कठीण दाणे गरम करून फुगवले जातात आणि मक्याच्या या फुगलेल्या दाण्यांना 'पॉपकॉर्न' म्हणतात. हे पॉपकॉर्न फुलवून खाताना मक्याचे दाणे तेल किंवा तुपात भाजून मग ते फुलवले जातात(How to make Popcorn at home with Normal Dry Corn).
सध्या पॉपकॉर्नमध्ये देखील अनेक प्रकारचे फ्लेवर्स येतात. चीज पॉपकॉर्न, टोमॅटो फ्लेवर्स पॉपकॉर्न, चीझ पॉपकॉर्न, पेरी पेरी पॉपकॉर्न असे अनेक फ्लेवर्सचे पॉपकॉर्न बाहेर अगदी सहज विकत मिळतात. बाहेर विकत मिळणारे हे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पॉपकॉर्न बऱ्यापैकी महाग असतात. त्यामुळे आपण घरच्या घरीच कपभर मक्याच्या दाण्यांचा वापर करुन वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पॉपकॉर्न अगदी स्वस्तात तयार करु शकतो. घरच्या घरी मक्याच्या दाण्यांपासून बटर पॉपकॉर्न, कॅरेमल पॉपकॉर्न, चीझ पॉपकॉर्न कसे तयार करावेत याची सोपी रेसिपी पाहूयात(How do you make popcorn from corn seeds).
कपभर मक्याच्या दाण्यांचे करा वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पॉपकॉर्न...
१. बटर पॉपकॉर्न(Butter Popcorn) :- पॉपकॉर्न घरच्या घरी तयार करण्यासाठी आपल्याला मक्याचे दाणे, तेल आणि बटर असे साहित्य लागणार आहे. एका मोठ्या कुकरमध्ये ( Homemade Popcorn in Cooker in easy steps) किंवा मोठ्या टोपात थोडेसे तेल घालून ते तेल गरम होऊ द्यावे. तेल गरम झाल्यावर त्यात थोडेसे बटर घालावे. तेल आणि बटर थोडे गरम झाल्यावर त्यात मक्याचे दाणे घालावेत. त्यानंतर या कुकरवर त्याचे झाकण उलटे ठेवावे किंवा एक मोठे झाकण त्या भांड्यावर ठेवावे. ५ ते ८ मिनिटे ते असेच झाकून गॅसच्या मंद आचेवर ठेवावे. ५ मिनिटांनी आतून पॉपकॉर्न फुलून तडतडण्याचा आवाज येऊ लागेल तेव्हा गॅस बंद करुन झाकण उघडून हे पॉपकॉर्न काढून घ्यावेत. हे पॉपकॉर्न गरम असतानाच त्यावर हलकेसे मीठ भुरभुरवून घ्यावे. आपले पॉपकॉर्न खाण्यासाठी तयार आहेत.
स्वयंपाकात आले तर वापरता पण लक्षात ठेवा ४ सोप्या टिप्स, पदार्थाची चव अशी की भूक खवळेल...
२. कॅरेमल पॉपकॉर्न (Caramel Popcorn) :- कॅरेमल पॉपकॉर्न तयार करण्यासाठी सर्वात आधी साधे पॉपकॉर्न तयार करुन घ्यावेत. त्यानंतर कॅरेमल तयार करण्यासाठी एका मोठ्या कढईत साखर घालून ती व्यवस्थित कढईच्या तळाशी पसरवून घ्यावी. साखर मंद आचेवर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत चमच्याने हलवत राहावी. हळुहळु साखर वितळून त्याचा पाक तयार होईल. साखरेचा पाक तयार झाल्यावर गॅसची फ्लेम बंद करुन त्यात १ टेबलस्पून बटर आणि १/२ टेबलस्पून बेकिंग सोडा घालून हलवून घ्यावे. आता पॉपकॉर्नसाठी लागणारे कॅरेमल तयार आहे, या तयार कॅरेमल मध्ये तयार करुन घेतलेले पॉपकॉर्न घालून ते कॅरेमलने व्यवस्थित कोट करून घ्यावे. कॅरेमल पॉपकॉर्न खाण्यासाठी तयार आहेत.
३. चीझ पॉपकॉर्न (Cheese Popcorn) :- एका मोठ्या डिशमध्ये चीझ किसून घ्यावे. हे किसून घेतलेले चीझ मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये १० मिनिटांसाठी बेक करुन घ्यावे. त्यानंतर हे बेक केलेले चीझ एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात चवीनुसार लाल तिखट मसाला आणि मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक पूड वाटून चीझ पॉपकॉर्नसाठी लागणारी चीझ पावडर तयार करुन घ्यावी. आता एका मोठ्या डिशमध्ये पॉपकॉर्न घेऊन त्यावर ही चीझ पावडर भुरभुरवून घ्यावी. चीझ पॉपकॉर्न खाण्यासाठी तयार आहेत.
मदुराई स्पेशल ‘थन्नी चटणी’ खाऊन तर पाहा, इडली-डोसा लागेल मस्त-चमचमीत चटणीची रेसिपी...
अशाप्रकारे आपण मक्याच्या दाण्याचा वापर करून त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्सचे पॉपकॉर्न घरच्या घरी तयार करु शकता.