Join us

गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीसोबत हवीच बटाट्याची भाजी! ५ टिप्स- भाजी होईल खमंग आणि चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2025 16:58 IST

Potato Sabji Recipe: गुढीपाडव्याच्या स्वयंपाकात श्रीखंड- पुरीला महत्त्व असले तरी पुरीसोबत खायला बटाट्याची भाजी हवीच (how to make potato sabji more delicious?).. ती आणखी चवदार करण्यासाठी नेमकं काय करता येईल ते पाहूया..(5 tips for making potato sabji more tasty for gudhi padva celebration)

ठळक मुद्देउकडलेल्या बटाट्याची भाजी कशी करायची याची रेसिपी तर सगळ्यांना माहिती आहेच, पण आता आपण ती भाजी जास्त चवदार होण्यासाठी काय करता येईल ते पाहूया..

गुढीपाडवा आता अवघ्या २ ते ३ दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे घरोघरी महिला वर्गाची तयारी सुरू झाली आहे. घर आवरणे, गुढी उभारण्याची जागा स्वच्छ करणे, गुढी उभारण्याचे साहित्य शोधून ठेवणे, पुजेची तयारी करणे ही सगळी कामं तर असतातच. पण त्या जोडीला स्वयंपाकाचीही तयारी करावीच लागते. आता गुढीपाडवा म्हटलं की स्वयंपाकात सगळ्यात पहिला मान श्रीखंड- पुरीचा. आणि त्यातही पुरी म्हटलं की तिच्या जोडीला बटाट्याची भाजी आपसूक येतेच.. बऱ्याचदा श्रीखंडाच्या समोर बटाट्याची भाजी फिकी पडते आणि ती खाल्ली जात नाही (Potato Sabji Recipe). म्हणूनच या थोड्या वेगळ्या टिप्स पाहून बटाट्याची भाजी करून पाहा (how to make potato sabji more delicious?).. घरातल्या सगळ्या मंडळींना ती हमखास आवडेल..(5 tips for making potato sabji more tasty for gudhi padva celebration)

उकडलेल्या बटाट्याची भाजी चवदार होण्यासाठी टिप्स

 

उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी करायची याची रेसिपी तर सगळ्यांना माहिती आहेच, पण आता आपण ती भाजी जास्त चवदार होण्यासाठी काय करता येईल ते पाहूया..

टीव्ही, लॅपटॉप स्क्रिन स्वच्छ करण्याचा सोपा उपाय! स्क्रॅचेस न येता डाग होतील स्वच्छ 

१. बटाट्याची भाजी करताना अनेक जण त्यात मिरच्यांचे तुकडे घालतात. असं न करता एक थोडी वेगळी पद्धत वापरून पाहा. तुमच्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्या. त्यांचे बारीक तुकडे करा. मिरच्यांचे तुकडे, आल्याचा एक छोटासा तुकडा असं सगळं मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या. किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून घ्या. जर लसूण चालत असेल तर या मिश्रणात लसूण सुद्धा घाला. आता ही पेस्ट भाजीमध्ये घाला. मिरच्यांचे तुकडे घालून केलेल्या भाजीपेक्षा अशी भाजी जास्त चवदार लागते.

 

२. बटाट्याची भाजी करण्यासाठी जेव्हा आपण फोडणी करतो तेव्हा फोडणी तडतडल्यावर त्यात अगदी एखादा टीस्पून उडदाची डाळ सुद्धा घालावी. उडदाच्या डाळीमुळे भाजीला जास्त छान स्वाद येतो.

सोनं महागलं तरी गुढीपाडव्याला छोटासा दागिना घ्यायचाय? ५ पर्याय- मुहर्ताची खरेदी होईल जोरदार

३. कोथिंबीर आणि वाटाणे या दोन गोष्टी बटाट्याच्या सुक्या भाजीमध्ये हमखास हव्याच.. कारण त्यामुळे भाजीची चव आणि सुगंध जास्त खुलून येतो.

 

४. बटाट्याच्या भाजीसाठी जेव्हा तुम्ही फोडणी कराल तेव्हा त्या फोडणीमध्ये लिंबाचा रस नक्की घाला. यामुळे भाजीला छान आंबूसपणा येतो. जर लिंबू नसेल तर त्याऐवजी थोडी आमचूर पावडर घातली तरी चालेल.

गुढीपाडवा स्पेशल: श्रीखंड आणखी चवदार होण्यासाठी त्यात ५ पदार्थ नक्की घाला, स्वाद जास्त खुलेल

५. सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवून ती मंद आचेवर ८ ते १० मिनिटे चांगली वाफवून घ्या. कारण बटाट्याची भाजी पुरेशी वाफवली गेली तरच ती अधिक चवदार लागते. पण भाजी वाफवत असताना ती कढईच्या बुडाला लागणार नाही याची मात्र काळजी घ्या. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.बटाटागुढीपाडवा