Lokmat Sakhi >Food > १० मिनिटांत करा वाटीभर रव्याचा मऊसूत प्रसादाचा शिरा, सोपी रेसिपी-गुरुवारचा नैवैद्य झटपट

१० मिनिटांत करा वाटीभर रव्याचा मऊसूत प्रसादाचा शिरा, सोपी रेसिपी-गुरुवारचा नैवैद्य झटपट

How to Make Prasadacha Sheera : जर तुम्ही पूजा किंवा प्रसादासाठी शीरा बनवत नसाल तर तुपाचे प्रमाण कमी करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 03:35 PM2023-08-16T15:35:28+5:302023-08-17T14:42:32+5:30

How to Make Prasadacha Sheera : जर तुम्ही पूजा किंवा प्रसादासाठी शीरा बनवत नसाल तर तुपाचे प्रमाण कमी करू शकता.

How to make Prasadacha Sheera : Rawa sheera recipe in marathi semolina sheera recipe | १० मिनिटांत करा वाटीभर रव्याचा मऊसूत प्रसादाचा शिरा, सोपी रेसिपी-गुरुवारचा नैवैद्य झटपट

१० मिनिटांत करा वाटीभर रव्याचा मऊसूत प्रसादाचा शिरा, सोपी रेसिपी-गुरुवारचा नैवैद्य झटपट

श्रावण महिन्यात बरेच उपवास, सण-उत्सव येत असतात. अशावेळी सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजेच गोड धोड पदार्थ. वेळात वेळ काढून नैवेद्य दाखवावाच लागतोच.  प्रसादाचा शिरा  हा  नैवेद्यासाठी उत्तम पदार्थ आहे याशिवाय घरातील सगळेजण आवडीनं हा शीरा खातात. प्रत्येकाची शीरा बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. (Prasadacha Sheera Recipe) काहीजण नाश्त्याला दर २ ते ३ दिवसाआड शिरा बनवतात. पण परफेक्ट शीरा प्रत्येकालाच करायला जमतो  असं नाही.

कधी रवा व्यवस्थित भाजला जात नाही तर कधी तूप कमी पडतं, कधी शीरा कमी गोड बनतो. प्रसादाचा शिरा बनवण्याची परफेक्ट रेसिपी पाहूया. (How to make prasadacha sheera) प्रसादासाठी तुम्ही रव्याऐवजी बेसानाचा किंवा गव्हाच्या पीठाचा शीरासुद्धा बनवू शकता. 

प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुपात रवा भाजून घ्या. रवा चांगला भाजला जाण्यासाठी जितका रवा घेतला असेल तर तितकंच तूप घ्या. रवा भाजून झाल्यानंतर त्यात बदामाचे काप, पिस्त्याचे लहान तुकडे, काजूचे तुकडे, मनुके घाला. चमच्याने रवा आणि ड्रायफ्रुट्स व्यवस्थित एकजीव करून घ्या.  त्यात केळ्याचे काप घालून पुन्हा व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर दूध घालून पुन्हा एकजीव करा.

गरजेनुसार १ ते २ कप दूध घालून पुन्हा रवा ढवळून घ्या. झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या.  त्यात वाटीभर साखर घालून व्यवस्थित एकजीव करा. साखर वितळ्याल्यानंतर १ ते २ चमचे वेलची पूड घाला. त्यात तुळशीची पानं, गुलाबाच्या पाकळ्या घालून शीरा सर्व्ह करा तयार आहे गरमागरम प्रसादाचा शीरा. 

शिरा परफेक्ट बनवण्यासाठी टिप्स

जर तुम्ही पूजा किंवा प्रसादासाठी शीरा बनवत नसाल तर तुपाचे प्रमाण कमी करू शकता. रवा भाजताना व्यवस्थित टेक्सचर योग्य येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत भाजा. केळी आणि तुळशीचं पान मिसळल्याने शीऱ्याला वेगळी चव येते. शिऱ्यात उकळतं दूध घातल्याने शिऱ्याची चव वाढेल  आणि चिकट होणार नाही.

Web Title: How to make Prasadacha Sheera : Rawa sheera recipe in marathi semolina sheera recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.