Join us  

How To Make Protein Bar At Home : आता घरीच करा ताकद वाढवणारे प्रोटीन बार, साहित्य कमी-न्यूट्रिशन जास्त-पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2022 11:38 AM

How To Make Protein Bar At Home : विकतचे प्रोटीन बार कशाला आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी झटपट करता येतील प्रोटीन बार

ठळक मुद्देआपण आवडीप्रमाणे दाणे, बेदाणे, जरदाळू, चॉकलेट, खारीक पावडर असे घालू शकतो.    झटपट एनर्जी देणारे प्रोटीन बार आपल्याजवळ असायला हवेत, फास्टफूडपेक्षा हे केव्हाही चांगले

प्रोटीन्स ही शरीरातील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी तर कधी वजन कमी करण्यासाठी प्रोटीन्स अतिशय महत्त्वाचे ठरतात. केवळ मांसाहार केला म्हणजेच आपल्याला भरपूर प्रोटीन्स मिळतात असे नाही. तर त्याशिवायही अनेक पदार्थांमधून आपल्या शरीराची प्रोटीनची गरज भागू शकते. शरीरात प्रोटीनचे प्रमाण चांगले असेल तर हाडे ठणठणीत राहण्याबरोबरच रक्तदाबाचा त्रासही होत नाही.हाडांच्या बळकटीसाठी, प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी, स्नाय़ूंच्या बांधणीसाठी आणि इतरही अनेक कार्यांसाठी शरीलाला पुरेशा प्रमाणात प्रथिनांची आवश्यकता असते. मात्र ही प्रथिने योग्य प्रमाणात न मिळाल्यास आपल्याला आरोग्याच्या विविध तक्रारींना सामोरे जावे लागते (How To Make Protein Bar At Home) . 

(Image : Google)

मांसाहारी पदार्थांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. मात्र शाकाहारी पदार्थांमध्येही प्रोटीन्स असतात. आहारात जास्तीत जास्त प्रोटीनचा समावेश असायला हवा. पण पुरेशा प्रमाणात ते मिळतातच असे नाही. मात्र व्य़ायामाच्या आधी, व्यायाम झाल्यावर किंवा दोन जेवणांच्या मधल्या वेळात भूक लागल्यावर इतर काही खाण्यापेक्षा प्रोटीन बार खाल्लेले केव्हाही चांगले. बराच वेळ बाहेरची कामे असल्यास आपल्याला भूक लागते अशावेळीही हे प्रोटीनबार जवळ ठेवले असतील तर आपण पटकन खाऊ शकतो. गावाला जाताना किंवा कोणत्याही भुकेच्या वेळी हे बार खाणे हा उत्तम पर्याय असतो. असे प्रोटीन देणारे प्रोटीन बार कसे करायचे पाहूयात...

साहित्य 

खजूर - १ वाटीकाजू - १ वाटी बदाम - १ वाटी पिस्ते - पाव वाटीआक्रोड - अर्धी वाटी तीळ - पाव वाटी खोबऱ्याचा कीस - अर्धी वाटीमध - अर्धी वाटीवेलची पावडर - अर्धा चमचामीठ - पाव चमचाओटस - १ वाटी

कृती

१. बिया काढलेला काळा खजूर घेऊन तो २ तास अर्धी वाटी कोमट पाण्यात भिजवावा, त्यानंतर पाण्यासकट तो मिक्सरमधून काढावा.२. एका कढईत बदाम, काजू, आक्रोड, पिस्ते आणि भोपळ्याच्या बिया मंद आचेवर गरम करा. ३. थोडा वेळाने यामध्ये खोबऱ्याचा किस घालून पुन्हा भाजून घ्या. ४. हे सगळे एका बाऊलमध्ये काढून ठेवा.५. त्याच कढईमध्ये खजूराची पेस्ट घाला, हलवून थोडी गरम करुन घ्या.६. त्यामध्ये भाजलेले ड्रायफ्रूट, मध आणि वेलची पूड घाला.७. चवीपुरते मीठ घालून हे सगळे मिश्रण बारीच गॅसवर एकजीव करुन घ्या.८. ओटस भाजून त्याची बारीक पूड करुन ती या मिश्रणात घाला. ९. सगळे एकजीव करुन त्याचा घट्ट गोळा होईल असे करा. १०. एका ताटात एकसारखे पसरुन १ तास हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. ११. बाहेर काढल्यानंतर त्याच्या तुम्हाला आवडतील तशा वड्या कापा आणि हे प्रोटीन बार खा. १२. यामध्ये आपण आवडीप्रमाणे दाणे, बेदाणे, जरदाळू, चॉकलेट, खारीक पावडर असे घालू शकतो.    

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आरोग्य