Join us

पुऱ्या तेलकट, कडक होतात? 'या' पद्धतीनं पीठ मळा, टम्म फुगतील पुऱ्या, तेलही कमी लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:26 IST

How To Make Puffed And Soft Puri : टम्म फुगलेल्या पुरी बनवण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स ट्राय करू शकता.

तुम्ही चपाती, पराठे रोज खात असाल पण सणाच्या दिवशी मात्र पुऱ्याच खाल्ल्या जातात. अनेकदा चपाती खायचं मन असतं पण लोक नाश्त्याला पुरी खातात. (How To Make Puffed And Soft Puri). अनेकदा पुऱ्या फुगत नाही तर फार तेलकट होतात. अशी बऱ्याच महिलांची तक्रार असते. पुरी सॉफ्ट तेव्हाच बनते तेव्हा तुम्ही पीठ व्यवस्थित मळता. टम्म फुगलेल्या पुरी बनवण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स ट्राय करू शकता. (How To Make Puffed And Soft Puri Kneading Dough Follow These 4 Steps)

सॉफ्ट फुगलेल्या पुरी कशा कराव्यात

तुम्हाला पुरीचं पीठ मळताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. पीठ व्यवस्थित मळून घ्या. एका भांड्यात पीठ घ्या. जे परफेक्ट पुरी बनवण्यासाठी आवश्यक असते. पहिल्यांदा गाळणीनं गाळून घ्या. ज्यामुळे सर्व कण निघून जातील आणि पुरी लाटताना फाटणार नाही.

केस फारच गळतात? जास्वंदात हा पदार्थ मिसळून हेअर मास्क लावा; दाट, लांबसडक होतील केस

पुरीचं पीठ पूर्ण सैल असू नये पीठ थोडं घट्ट असावं. कमीत कमी पाणी घालून पीठ मळून घ्या. मळलेल्या पिठावर एका कापडानं ५ मिनिटं झाकून ठेवा. ज्यामुळे पुरी व्यवस्थित फुलेल. त्यानंतर हातानं छोटे छोटे गोळे तोडून घ्या. पिठावर क्रॅक नसेल असं पाहा नाहीतर पुरी व्यवस्थित फुलणार नाही.

पुरीवर थोडं तेल घाला. पुरीचं पीठ मळताना सुक्या पिठाचा वापर करू नका. हाताला तेल लावून नंतर पुरी बनवा. लाटणे पूर्णपणे साफ, स्मूद असेल याची काळजी घ्या. त्यावर हलकं तेल लावा. कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात पुरी तळून घ्या.

पोटाचा घेर कमीच होत नाही? रोज हे पिवळं ड्रिंक प्या, भराभर कमी होईल चरबी, सुडौल दिसाल

चमच्याच्या मदतीनं पुरी व्यवस्थित दाबत राहा आणि फिरवा. मग पुरी हळूहळू फुलायला सुरूवात होईल. पुरी गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर प्लेटमध्ये काढा. यातील एक्स्ट्रा तेल निघून जाईल आणि नंतर पुरी काढून किचन टॉवेल किंवा पेपरवर ठेवा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स