Lokmat Sakhi >Food > पुऱ्या टम्म फुगत नाहीत, फार तेल पितात? पीठ भिजवताना घाला १ पांढरी सिक्रेट गोष्ट

पुऱ्या टम्म फुगत नाहीत, फार तेल पितात? पीठ भिजवताना घाला १ पांढरी सिक्रेट गोष्ट

How to make Puffy & Soft Poori | Puri Recipe रक्षा बंधनला करा टम्म फुगणारी - कमी तेल पिणारी कुरकुरीत पुरी, हॉटेलस्टाईल पुऱ्या करा घरच्या - घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2023 02:19 PM2023-08-27T14:19:17+5:302023-08-27T14:20:23+5:30

How to make Puffy & Soft Poori | Puri Recipe रक्षा बंधनला करा टम्म फुगणारी - कमी तेल पिणारी कुरकुरीत पुरी, हॉटेलस्टाईल पुऱ्या करा घरच्या - घरी

How to make Puffy & Soft Poori | Puri Recipe | पुऱ्या टम्म फुगत नाहीत, फार तेल पितात? पीठ भिजवताना घाला १ पांढरी सिक्रेट गोष्ट

पुऱ्या टम्म फुगत नाहीत, फार तेल पितात? पीठ भिजवताना घाला १ पांढरी सिक्रेट गोष्ट

सण, उत्सव म्हटलं की, अनेक घरात पुरी - श्रीखंड, पुरणपोळी, असे पारंपारिक पदार्थ तयार केले जातात. अनेकांकडे पुरी श्रीखंडाचा बेत आखला जातो. गरमागरम पुरीसोबत बटाट्याची भाजी, श्रीखंड भन्नाट लागते. काही दिवसांवर बहिण - भावाचा सण म्हणजेच रक्षा बंधन येऊन ठेपला आहे. काही बहिणी भावासाठी खास श्रीखंड - पुरी तयार करतात.

पुऱ्या जर टम्म फुगलेल्या असतील तरच, त्या चविष्ट लागतात. काही वेळेला पुऱ्या व्यवस्थित फुलत नाही. किंवा जास्त तेल शोषून घेतात. जर आपल्या देखील पुऱ्या नीट फुगत नसतील, किंवा जास्त तेल पीत असतील तर, पीठ मळताना त्यात एक खास सिक्रेट गोष्ट मिक्स करा. या टिपमुळे पुऱ्या टम्म फुगेल, व गरजेपेक्षा जास्त तेलही शोषून घेणार नाही(How to make Puffy & Soft Poori | Puri Recipe ).

पुरीचे कणिक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

गव्हाचे पीठ - २ कप

साखर

दूध - १/२ कप

ओवा - १/२ टीस्पून

तेल - १ टीस्पून

ग्लासमधली अळूवडी? फक्त १० मिनिटांत होणारी ही आंबट गोड अळूवडी झटपट करा सहज घरी

पाणी - आवश्यकतेनुसार

मीठ - चवीनुसार

कृती

चपाती करण्यासाठी आपण पीठ मऊ मळतो. पण पुरी तयार करताना पीठ घट्टसर मळावे. यामुळे पुरी फुलतात, व कुरकुरीत होतात. यासाठी एका बाऊलमध्ये २ कप गव्हाचं पीठ घ्या. त्यात चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. पिठात साखर घातल्याने पुऱ्या तळल्यानंतर ब्राऊन होत नाही. यानंतर पिठात अर्धा चमचा ओवा, आणि थोडं दूध घालून पीठ मळून घ्या.

ब्रेकफास्ट कधी करावा? लंच आणि डिनरमध्ये किती तासाचं अंतर असावं? होमिओपॅथिक डॉक्टर सांगतात..

पिठात दूध मिक्स केल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा. पुरीसाठी पीठ मळताना घट्ट मळावे. त्यात जास्त पाणी घालू नका. पुरीसाठी पीठ मळून घेतल्यानंतर हाताला थोडे तेल लावा, व पुन्हा पीठ मळून घ्या. असे केल्याने पुऱ्या कुरकुरीत होतील. पीठ मळून झाल्यानंतर, त्यावर सुती कापड झाका. कापड कोरडे असावे हे लक्षात ठेवा. २० मिनिटे पीठ झाकून ठेवा. २० मिनिटानंतर पुन्हा पीठ मळून घ्या. अशा प्रकारे पुऱ्या करण्यासाठी आपले पीठ रेडी झाले आहे.

आता आपण हव्या त्या आकाराच्या पुऱ्या तयार करू शकता. परंतु, पुर्‍या जितक्या पातळ लाटल्या जातील तितक्या त्या फुगतील. व गरम तेलातच पुऱ्या तळून घ्याव्या. यामुळे पुऱ्या जास्त तेल शोषून घेणार नाही.

Web Title: How to make Puffy & Soft Poori | Puri Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.