Join us  

फक्त ४ गोष्टी वापरून बनवा खमंग पुलाव मसाला! शेफ कुणाल कपूर सांगतात त्यांची सिक्रेट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 2:19 PM

Food And Recipe: घरी पुलाव करण्याचा बेत असेल तर प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर (chef Kunal Kapur) यांची ही सिक्रेट रेसिपी तुम्हाला नक्कीच उपयोगाची ठरेल..(pulao masala recipe)

ठळक मुद्देसाधी सोपी, सुटसुटीत आणि सगळ्यात मुख्य म्हणजे झटपट होणारी ही रेसिपी आहे. ४ गोष्टी, फक्त २ स्टेप्स आणि पुलाव मसाला तयार..

बिर्याणी, पुलाव, शेजवान राईस, फ्राईड राईस असे भाताचे वेगवेगळे प्रकार नेहमीच हीट ठरतात. त्यामुळे ते आवडीने केलेही जातात आणि चाखलेही जातात. रविवारी संध्याकाळी डिनर प्लॅनसाठी किंवा एखाद्या छोटेखानी पार्टीसाठी मेनकाेर्स ठरवताना पुलाव करण्याचा बेत अनेकदा फायनल केला जातो. तुम्ही ज्या पद्धतीने पुलाव करता, तो तर झकास होतच असणार. पण त्याला जर आणखी टेस्टी ट्विस्ट द्यायचा असेल तर शेफ कुणाल यांची ही मसाला रेसिपी (How to make pulao masala at home) एकदा करून बघाच...

 

सामान्यपणे जर पुलाव करायचा असेल तर आपण त्यात सरळ विकतचा मसाला आणून टाकतो. पण असं करण्यापेक्षा या सिक्रेट रेसिपीने एकदा पुलाव मसाला घरीच तयार करून बघा. हा मसाला तयार करणं अतिशय सोपं आहे. ४ गोष्टी, फक्त २ स्टेप्स आणि पुलाव मसाला तयार.. अशी साधी सोपी, सुटसुटीत आणि सगळ्यात मुख्य म्हणजे झटपट होणारी ही रेसिपी आहे. शेफ कुणाल यांनी ही रेसिपी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजला शेअर केली आहे. 

 

कसा करायचा पुलाव मसाला?पुलाव मसाला करण्यासाठी कुणाल यांनी विलायची, लवंग, दालचिनी आणि बडिशेप अशा फक्त ४ गोष्टी वापरल्या आहेत. हे चारही पदार्थ एका पॅनमध्ये टाका आणि भाजून घ्या. खूप जास्त भाजू नका. पॅन टॉस करत हे पदार्थ भाजा. त्यानंतर ते एका भांड्यात काढा आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून त्यांची पावडर करून घ्या. खमंग पुलाव मसाला झाला तयार. पुलाव करताना हा मसाला आवर्जून वापरा. पुलाव नक्कीच अधिक स्वादिष्ट होईल, हे नक्की. 

 

कुणाल यांच्या या टिप्स लक्षात ठेवा...(Cooking Tips by Kunal Kapur)- मसाला करायचा असेल तेव्हा त्यातले पदार्थ खूप जास्त कधीच भाजू नका. - मसाल्याचे पदार्थ मोठ्या गॅसवर भाजणे टाळा.- पॅन टॉस करून मसाल्याचे पदार्थ भाजणे अधिक चांगले. - मसाले भाजून झाले की लगेचच गरम असतानाच मिक्सरमधून बारीक करणे टाळा. यामुळे मसाल्यांचा सुवास नष्ट होतो. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.कुणाल कपूर