दिवाळीच्या दिवसांत नेहमीच चपाती, भाजी, वरण, भात करायला कोणालाच आवडत नाही. दिवाळीच्या दिवसांत तुम्ही नवीन कोणतीही डिश ट्राय करू शकता (Cooking Hacks).जसं की पुलाव, बिर्याणी, मसाले भात हे पदार्थ खायला खूपच रूचकर लागतात आणि नेहमीच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळे बनवले असेल जेवणही चांगलं जातं. पुलाव बनवणं खूपच वेळखाऊ काम असतं असा अनेकांचा समज असतो पण तुम्ही कुकरमध्येही पुलाव बनवू शकता. कुकरमध्ये पुलाव करण्याची सोपी पद्धत कशी ते पाहूया. (How To Make Pulao At Home)
पुलाव करण्यासाठी लागणारं साहित्य (Pulav Making Tips)
१ वाटी तांदूळ
अर्धी वाटी मटार
१ कांदा
३ हिरव्या मिरच्या
१ लिंबाचा रस
गरजेनुसार हिरवे धणे
३ काळी मिरी
२ लवंगा
१ मोठी वेलची
१ तेजपत्ता
१ दालचिनीचा तुकडा
चवीनुसार मीठ
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा लाल मिरची पावडर
अर्धा चमचा धणे पावडर.
पुलाव बनवण्याची कृती
१) तांदूळ २ ते ३ वेळा व्यवस्थित धुवून घ्या नंतर ३० मिनिटं पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर सर्व भाज्या धुवून चिरून ठेवा. कूकरमध्ये तेल घालून गरम होऊ द्या.
२) नंतर जीरं आणि खडा मसाला घालून भाजून घ्या. नंतर त्यात बटाटा घाला आणि हळद घालून एकजीव करा. सर्व मसाले घालून एकजीव करा त्यानंतर तांदूळ घालून मसाल्यांमध्ये मिक्स करा नंतर १ मिनिटं भाजून घ्या.
३) मटार घालून गरजेनुसार पाणीसुद्धा घाला. शेवटी लिंबू मिसळून कुकरचं झाकण बंद करा. २ शिट्ट्या झाल्यानंतर मंद आचेवर ५ मिनिटं शिजू द्या.
४) कुकरची हवा निघाल्यानंतर झाकण काढून टाका, नंतर त्यात कोथिंबीर घाला. तयार आहे स्वादीष्ट पुलाव. गरमागरम पुलाव तुम्ही रायत्यासोबत खाऊ शकता.