Lokmat Sakhi >Food > भोपळ्याची भाजी नको? गरमागरम सूप करून प्या! अतिशय चवदार- पौष्टिक, चटकन बघा रेसिपी

भोपळ्याची भाजी नको? गरमागरम सूप करून प्या! अतिशय चवदार- पौष्टिक, चटकन बघा रेसिपी

How To Make Pumpkin Soup: लाल भोपळ्याची भाजी आवडत नसेल तर त्याचं सूप करून प्या.. पावसाळ्याच्या दिवसांत तर रात्रीच्या वेळी घेण्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे. (easy and simple recipe of pumpkin soup)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2024 09:11 AM2024-08-14T09:11:17+5:302024-08-14T09:15:01+5:30

How To Make Pumpkin Soup: लाल भोपळ्याची भाजी आवडत नसेल तर त्याचं सूप करून प्या.. पावसाळ्याच्या दिवसांत तर रात्रीच्या वेळी घेण्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे. (easy and simple recipe of pumpkin soup)

how to make pumpkin soup, easy and simple recipe of pumpkin soup, healthy soup for monsoon and winter, health benefits of pumpkin | भोपळ्याची भाजी नको? गरमागरम सूप करून प्या! अतिशय चवदार- पौष्टिक, चटकन बघा रेसिपी

भोपळ्याची भाजी नको? गरमागरम सूप करून प्या! अतिशय चवदार- पौष्टिक, चटकन बघा रेसिपी

Highlights भाजी, पराठा हे प्रकार सोडा आणि चमचमीत, गरमागरम पमकिन सूप करून घरातल्या मंडळींना प्यायला द्या..

काही भाज्या अशा असतात की त्यांना विशेष आवडीने कधीच खाल्लं जात नाही. त्यामुळे त्यांच्या वाट्याला खवय्यांचं प्रेम जरा कमीच येतं. अशा भाज्यांपैकीच एक आहे लाल भोपळा. आज स्वयंपाकात लाल भोपळ्याची भाजी आहे, हे ऐकलं तरी अनेकांची भूक उडून जाते. हा भोपळा नावडता असला तरी तो अतिशय पौष्टिक असतो. त्यामुळे थोडा का होईना पण तो प्रत्येकाच्या पोटात जायलाच पाहिजे (how to make pumpkin soup). म्हणूनच आता भाजी, पराठा हे प्रकार सोडा आणि चमचमीत, गरमागरम पमकिन सूप करून घरातल्या मंडळींना प्यायला द्या.. बघा अतिशय पौष्टिक रेसिपी (easy and simple recipe of pumpkin soup)

लाल भोपळ्याचं सूप करण्याची रेसिपी

 

साहित्य

३ कप भोपळ्याच्या चिरलेल्या फोडी

५ ते ७ लसूण पाकळ्या

अर्धा इंच आल्याचा किस

इम्युनिटी वाढविण्यासाठी माधुरी दीक्षित खाते ६ पदार्थ- बघा तिचे पती डॉ. नेने यांचा खास सल्ला..

१ मध्यम आकाराचा कांदा

१ चमचा तूप

१ टीस्पून जिरे

चवीनुसार मीठ

 

कृती

सगळ्यात आधी भाेपळ्याच्या साली काढून टाका आणि त्याच्या फोडी करून घ्या.

यानंतर कुकरच्या भांड्यात भाेपळ्याच्या फोडी, चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या, १ मिरची, आलं, जिरे असं सगळं घाला आणि कुकरमध्ये टाकून त्याच्या मध्यम आचेवर ४ ते ५ शिट्ट्या करून घ्या.

त्वचेसाठी, केसांसाठी राईस वॉटर चांगलंच..! पण ते करायचं कसं? बघा सोपी पद्धत- सौंदर्य खुलेल

यानंतर उकडलेले पदार्थ थंड झाले की ब्लेंडरने फिरवून त्याची पेस्ट करून घ्या.

आता ही पेस्ट एका पातेल्यात काढा. त्यात पाणी टाकून ती थोडी पातळ करा. त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि ते गॅसवर उकळायला ठेवा. सूप उकळलं की गॅस बंद करा आणि सगळ्यात शेवटी त्यात तूप घाला. तुम्हाला आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकू शकता. आता या गरमागरम सूपचा रिमझिम पावसात आनंद घ्या..

 

Web Title: how to make pumpkin soup, easy and simple recipe of pumpkin soup, healthy soup for monsoon and winter, health benefits of pumpkin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.