Lokmat Sakhi >Food > अस्सल पंजाबी लस्सी घरच्याघरी करण्याची सोपी रेसिपी, पंजाबी मिठी लस्सी पिऊन तर पाहा

अस्सल पंजाबी लस्सी घरच्याघरी करण्याची सोपी रेसिपी, पंजाबी मिठी लस्सी पिऊन तर पाहा

How to Make Punjabi Lassi Recipe, Check out sweet Recipe हॉटेलसारखीच नाही अस्सल पंजाबी चवीची गोड लस्सी घरीही सहज करता येते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2023 01:17 PM2023-04-24T13:17:07+5:302023-04-24T13:17:54+5:30

How to Make Punjabi Lassi Recipe, Check out sweet Recipe हॉटेलसारखीच नाही अस्सल पंजाबी चवीची गोड लस्सी घरीही सहज करता येते.

How to Make Punjabi Lassi Recipe, Check out sweet Recipe | अस्सल पंजाबी लस्सी घरच्याघरी करण्याची सोपी रेसिपी, पंजाबी मिठी लस्सी पिऊन तर पाहा

अस्सल पंजाबी लस्सी घरच्याघरी करण्याची सोपी रेसिपी, पंजाबी मिठी लस्सी पिऊन तर पाहा

उन्हाळ्यात जर कोणी हातात ग्लास भरून लस्सीचा दिला तर, किती खुश व्हाल ना? लस्सीची खरी मज्जा उन्हाळ्यात येते. गोड, घट्टसर दह्याची लस्सी पिताना शरीराला गारवा मिळतो. लस्सी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. दह्याची लस्सी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. दही आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते.

दह्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे दही खाल्याने आपल्या हाडांचे व दातांचे आरोग्य चांगले राहते. लस्सी संपूर्ण भारतात फेमस आहे. पण पंजाबी लस्सीची बातच न्यारी आहे. पंजाबी लस्सी हे एक पारंपारिक पेय आहे. पंजाबी लोकं आपल्या दैनंदिन आहारात याचा समावेश करतात. चला तर मग या गोड पदार्थाची कृती पाहूयात(How to Make Punjabi Lassi Recipe, Check out sweet Recipe).

पंजाबी लस्सी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

ताजे घट्ट दही

साखर

बर्फाचे तुकडे

दूध

ताजे क्रीम

पालकाची भाजी खाऊन कंटाळा आलाय? बनवा खमंग - कुरकुरीत पालकाची वडी, चव अशी करेल दिल खुश

इलायची पावडर

सुका मेवा

या पद्धतीने बनवा पंजाबी लस्सी

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात घट्ट दही व साखर मिसळून फेटून घ्या, आपण बिटरचा देखील वापर करू शकता. साखर जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत फेटून घ्या. साखर मिसळल्यानंतर त्यात बर्फाचे तुकडे टाकून पुन्हा फेटून घ्या. त्यानंतर थोडं दूध, आणि क्रीम घालून मिश्रण मिक्स करा.

साऊथ इंडियन कारा चटणीची झटपट कृती, इडली-डोशासोबत खाण्यासाठी चटकदार चटणी

मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात इलायची पावडर, सुका मेवा घालून मिक्स करा. आता ही लस्सी मातीच्या भांड्यात घालून ठेवा, त्यात क्रीम मिक्स करा. अशा प्रकारे पंजाबी लस्सी पिण्यासाठी रेडी. ही लस्सी आपण दुपारचे जेवण झाल्यानंतर पिऊ शकता. लस्सी जास्त घट्ट झाली असेल तर, आपण त्यात अधिक बर्फाचे तुकडे घालू शकता. त्यात आपण केसरचा देखील वापर करू शकता.

Web Title: How to Make Punjabi Lassi Recipe, Check out sweet Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.