Lokmat Sakhi >Food > घरच्याघरी तयार करा खोबऱ्याचं शुध्द तेल; घरगुती तेल आरोग्यासाठी फायदेशीर!

घरच्याघरी तयार करा खोबऱ्याचं शुध्द तेल; घरगुती तेल आरोग्यासाठी फायदेशीर!

शुध्द स्वरुपातलं खोबऱ्याचं तेल (pure coconut oil) हवं असल्यास ते घरीच तयार करणं योग्य. घरच्याघरी तयार केलेलं खोबऱ्याचं तेल (homemade coconut oil) आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदेशीर असतं. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2022 08:18 AM2022-08-25T08:18:44+5:302022-08-26T13:58:05+5:30

शुध्द स्वरुपातलं खोबऱ्याचं तेल (pure coconut oil) हवं असल्यास ते घरीच तयार करणं योग्य. घरच्याघरी तयार केलेलं खोबऱ्याचं तेल (homemade coconut oil) आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदेशीर असतं. 

How to make pure coconut oil at home? | घरच्याघरी तयार करा खोबऱ्याचं शुध्द तेल; घरगुती तेल आरोग्यासाठी फायदेशीर!

घरच्याघरी तयार करा खोबऱ्याचं शुध्द तेल; घरगुती तेल आरोग्यासाठी फायदेशीर!

Highlightsघरच्याघरी खोबऱ्याचं तेल करण्यासाठी नारळ ताजं घ्यावं.नारळाचं दूध फ्रिजमध्ये 10 ते 12 तास गार करणं आवश्यक असतं. 

आपल्या रोजच्या वापरात खोबऱ्याचं तेल असतंच. प्रामुख्याने  केसांची निगा राखण्यासाठी खोबऱ्याचं तेल (coconut oil)  वापरलं जातं. त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठीही खोबऱ्याचं तेल वापरलं जातं. खोबऱ्याच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे बघता ते बरेच जण आहारातही वापरतात. सौंदर्यासाठी किंवा खाण्यासाठी जे खोबऱ्याचं तेल वापरलं जातं ते आपण विकत घेतो. पण विकतच्या खोबऱ्याच्या तेलात बऱ्याचदा इसेन्शियल ऑइल मिसळलं जातं त्यामुळे खोबऱ्याच्या तेलाची शुध्दता नष्ट होते. खोबऱ्याचं तेल पूर्णपणे शुध्द स्वरुपात (virgin coconut oil)  असेल तर ते आरोग्यासाठी परिणामकारक ठरतं. असं शुध्द खोबऱ्याचं तेल आपण सहज घरी (how to make pure coconut oil at home)  तयार करु शकतो. 

Image: Google

घरच्याघरी खोबऱ्याचं तेल तयार करताना..

खोबऱ्याचं तेल तयार करण्यासाठी ताजं नारळ घ्यावं. नारळ फोडून नारळातलं खोबरं काढावं. नारळ किसून किंवा खोवून घ्यावं. किंवा नारळाचे बारीक तुकडे करुन ते मिक्सरमधून बारीक करुन घ्यावं. किसलेलं/ खोवलेलं किंवा मिक्सरमधून बारीक केलेलं खोबरं एका सुती कापडात बांधून ते पिळून त्याचं दूध काढावं. दोन ते तीन वेळा खोबरं कापडातून पिळून घ्यावं.   

नारळाचं हे दूध एका भांड्यात काढाव. दूध फ्रिजमध्ये ठेवावं.  दूध 10 ते 12 तास फ्रिजमध्ये गार होवू द्यावं. साधारण 12 तासानंतर दुधावर घट्ट साय आलेली दिसेल. ही सर्व् साय कढईत काढावी. नंतर कढई गरम होण्यास ठेवावी.  गॅसवर ठेवल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी साय घट्ट होत जावून तेल  निघायला सुरुवात होईल. ही प्रक्रिया होतांना साय चमच्यानं सतत हलवत राहावी. तेल थोडं तपकिरी व्हायला लागलं की गॅस बंद करावा आणि हे तेल गाळून एका बाटलीत भरुन ठेवावं. 

Image: Google

घरी तयार केलेलं हे खोबऱ्याचं तेल शुध्द स्वरुपात असून यालाच 'व्हर्जिन कोकोनट ऑइल' असं म्हणतात. शुध्द स्वरुपातलं हे खोबऱ्याचं तेल आरोग्यासाठी , त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर असतं.  सकाळी कोऱ्या चहात 1 चमचा शुध्द खोबऱ्याचं तेल टाकून चहा प्यायल्यस पोटाच्या समस्या दूर होतात. सांध्यांचे विकार कमी होतात.  वजन कमी करण्यासाठी शुध्द खोबऱ्याचं तेल आहारात असण्याला महत्व आहे. आपल्या नेहमीच्या तेलाला पर्याय म्हणून शुध्द खोबऱ्याचं तेल वापरता येतं. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, अल्झायमरचा धोका टाळण्यासाठी शुध्द खोबऱ्याचं तेल सेवन करण्याला महत्व आहे. केस आणि त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी हे शुध्द स्वरुपातलं खोबऱ्याचं तेल फायदेशीर ठरतं. 
 

Web Title: How to make pure coconut oil at home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.