हिवाळ्याच्या (Winter Special) दिवसांत फ्रेश मुळे दिसायला सुरूवात होते. (Radish chutney) मुळ्याची भाजी काहीजणांना आवडते तर काहीजणांना अजिबात आवडत नाही. (How to Make Radish Chutney) अशावेळी तुम्ही अगदी कमीत कमी वेळात मुळ्याची चटणी बनवून आस्वाद घेऊ शकता. मुळ्याची चटणी करायला अतिशय सोपी असते. तोंडाला पाणी सुटेल अशी चटपटीत मुळ्याची चटणी जेवणताना ताटात असेल तर साध्या जेवणालाही मस्त चव येईल आणि तुम्ही पोटभर जेवाल. मुळ्याची चटणी तुम्ही चपाती, भाकरी, भात कशाहीबरोबर खाऊ शकतात. (How to Make Radish Chutney)
१) मध्यम आकाराचे २ मुळे घेऊन स्वच्छ धुवून घ्या. मुळ्याचे पुढचे आणि मागचे टोक कापून घ्या. नंतर मुळ्याची सालं काढून घ्या. मुळाचे साल काढल्यानंतर मुळा बारीक किसून घ्या. तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर मुळा वाटू शकता.
२) एका पॅनमध्ये २ टेबलस्पून तेल घालून गॅस ऑन करा. नंतर तेल चारही बाजूंना परसरवून घ्या तेल गरम झाल्यानंतर त्यात ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या घालून परतवून एका ताटात काढून घ्या.
साखर-गूळ न घालता करा पौष्टीक ड्रायफ्रुट्सचे लाडू; हिवाळ्यात रोज १ लाडू खा-हाडं होतील स्ट्राँग
३) त्यानंतर ३ ते ४ कश्मिरी लाल मिरच्या तेलात तळून घ्या. यात १ इंच आल्याचा तुकडा घालून तळून घ्या. आलं तळल्यामुळे त्याचा कच्चा वास निघून जातो. आलं एका ताटात काढून या
४) कढईत १ छोटा चमचा जीरं घाला, मग त्यात किसलेला मुळा घाला, यातच मध्यम आकाराच टोमॅटो पातळ चिरून घाला. ३ ते ४ मिनिटं शिजवल्यानंतर गॅस बंद करा आणि हे मिश्रण थंड करून घ्या.
५) मिक्सरच्या भांड्यात मिरची किंवा लसूण घालून बारीक पावडर तयार करून घ्या. त्याच भांड्यात मुळ्याचे मिश्रण घालून १ त्यात १ चमचा मीठ, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा व्हिनेगर घालून मिक्सरमधून बारीक करून घ्या. व्हिनेगरमुळे चटणी जास्त दिवस चांगली राहते.
थंडीत कुकरमध्ये झटपट करा बाजरीची पौष्टीक खिचडी; सोपी रेसिपी-मऊ खिचडीचा बेत होईल मस्त
६) कढईत तेल घालून मोहोरी, जीरं, कढीपत्ता, हिंग, लाल मिरची घालून ही फोडणी तयार मुळ्याच्या मिश्रणात घालून एकजीव करा. तयार आहे चटपटीत मुळ्याची चटणी