Join us  

घरच्याघरी मनुका बनवण्याची पाहा सोपी रीत, मनुकांसाठी कोणती द्राक्षे चांगली...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 11:46 AM

How to Make Raisins from Green Grapes : मनुके शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी तसंच रक्त स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

मनुक्यांचा वापर रोजच्या खाण्यातील वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खासकरून कस्टर्ड, मिठाई, पुलाव आणि खीर तयार करण्यासाठी मनुक्यांचा वापर केला जातो. (Cooking Tricks) तज्ज्ञांच्यामते मनुके शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी तसंच रक्त  स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर ठरतात. (How to make raisins from green grapes)

मनुक्यांमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. प्रकारानुसार मुक्यांच्या किंमतीत फरक दिसून येतो. द्रांक्षांपासून मनुके बनवण्याची सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये पाहूया. घरी मनुक बनवण्याचे २ फायदे होतात. एक म्हणजे तुम्हाला नेहमी बाजारातून मनुके आणावे लागणार नाही आणि खर्चही कमी होईल. (How To Make Homemade Raisins)

द्राक्षांपासून मनुके बनवण्याची योग्य पद्धत

१) मनुके बनवण्यासाठी सगळ्यात आधी द्राक्ष उकळत्या पाण्यात ५ ते १० मिनिटं शिजवून  घ्या.  त्यानंतर थंड पाण्यात ही द्राक्ष घाला. द्राक्षांचे देठ काढून टाका. त्यानंतर कोरड्या कापडावर ठेवा.

रोज झोपताना ४ गोष्टी करा, कायम कंट्रोलमध्ये राहील शुगर, अचानक शुगर वाढण्याची भितीच नसेल

२) एका स्वच्छ कापडानं द्राक्ष व्यवस्थित पुसून घ्या. कापडानं पुसल्यानंतर २ ते ३ दिवसांसाठी द्राक्ष सुकायला ठेवा. द्राक्षांना पूर्ण सुकायला जवळपास ४ ते ५ दिवस लागतात. जास्त मॉईश्चर असल्यास एक आठवडाही लागू शकतो.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स