Join us  

१o मिनिटांत करा झणझणीत राजस्थानी लसूण चटणी, रंग आणि चव अशी की भूक खवळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 10:58 AM

How To Make Rajasthani Garlic Chutney राजस्थानी लसणाची चटणी वाढवेल जेवणाची रंगत, १० मिनिटात होते रेडी..

लसूण फक्त पदार्थाची चव वाढवत नाही तर, आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. लसणात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. लसणाची फोडणी दिल्यामुळे पदार्थाची चवच बदलते. पण आपण कधी लसणाची चटणी खाल्ली आहे का?

लसणाची चटणी अनेक प्रकारे केली जाते. आज आपण राजस्थानी पद्धतीची लसूण चटणी कशी बनवायची हे पाहूयात. ही चटणी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते. यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी आपण ही चटणी ट्राय करून पाहू शकता. चला तर मग या चविष्ट चटणीची कृती पाहूयात(How To Make Rajasthani Garlic Chutney).

राजस्थानी स्टाईल लसणाची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

लसणाच्या पाकळ्या

टोमॅटो

आल्याचा तुकडा

लाल सुक्या मिरच्या

कोथिंबीर

ओवा - १ टीस्पून

बडीशेप - १ टीस्पून

जिरे - १ टीस्पून

हिंग

देसी तूप - २ चमचे

मीठ - चवीनुसार

कृती

सर्वप्रथम, लसूण सोलून घ्या. एका खलबत्यात कोथिंबीर, ओवा, बडीशेप, ४-५ लाल मिरच्या, लसणाच्या पाकळ्या घालून कुटून घ्या. जर हवं असल्यास आपण त्यात पाणी देखील अॅड करू शकता. आता मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोचे तुकडे, उरलेल्या लाल मिरच्या घालून बारीक पेस्ट तयार करा.

एका भांड्यात देशी तूप घालून गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात जिरे, हिंग घालून थोडं परतून घ्या. यानंतर कढईत ठेचलेला लसणाचा मसाला, व चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. यानंतर त्यात टोमॅटो आणि मिरचीची पेस्ट घालून मिक्स करा. पेस्ट अधूनमधून चमच्याने ढवळत राहा. यानंतर गॅस बंद करा. व ही चटणी एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. अशा प्रकारे राजस्थानी स्टाईल लसणाची चटकदार चटणी ख्ण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स