उन्हाळा सुरु झाल्यानंतर महिलावर्ग पापड बनवण्याच्या तयारीला लागतात. तांदूळ, साबुदाणा, बटाटे, नाचणी, रवा, उडीद डाळ अशा प्रकारचे पापड बनवतात. काही पापड बनवायला सोपे आहेत तर, काही कठीण. हे कुरकुरीत पापड जेवणासोबत अप्रतिम लागतात. आपण कधी खिचियापापड खाल्ले आहेत का? राजस्थानी स्पेशल खिचियापापड हे तांदळाचा वापर करून बनवले जाते. जे चवीला उत्कृष्ट व झटपट बनते.
आकाराने लहान, मात्र तळून झाल्यानंतर टम्म फुलतात. या खमंग पापडाच्या रेसिपीसाठी कमी साहित्य लागते. हे पापड साठवून ठेवल्यास वर्षभर टिकते. चला तर मग या कुरकुरीत पदार्थाची कृती पाहूयात(How to make Rajasthani Style khichiya papad recipe ).
राजस्थानी स्टाईल खिचियापापड बनवण्यासाठी लागणारं साहित्य
तांदूळ
पाणी
लसूण - हिरवी मिरची पेस्ट
जिरं
ओवा
मीठ
पापड खार
कोथिंबीर
कमी साहित्यात ५ मिनिटात तयार होते बिटाचे लालचुटूक रायते, उन्हाळ्यात जेवताना हवेच
कृती
सर्वप्रथम, एका कुकरच्या भांड्यात १० ग्लास पाणी घाला. १ ग्लास तांदूळ घेतल्यास त्याचे पाच पट पाणी घालावे. या ठिकाणी आपण २ ग्लास तांदूळ घेतले आहे, त्यामुळे १० ग्लास पाणी कुकरच्या भांड्यात टाकावे. आता त्या पाण्यात प्रत्येकी एक चमचा जिरं, ओवा, मीठ, पापड खार घालून पाण्याला उकळी आणण्यासाठी गॅसवर ठेवा.
भाजी किंवा पदार्थात चुकून तेल जास्त पडले? ते कसे कमी करणार?- ४ टिप्स
पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात भिजत ठेवलेले २ ग्लास तांदूळ घाला. आपण हे तांदूळ याआधी ५ तासांसाठी पाण्यात भिजत ठेवले होते. आता त्यावर झाकण ठेवा, व कुकरच्या ५ शिट्या झाल्यानंतर त्यात लसूण - हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे. हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा मिश्रण मिक्स करा. अशा प्रकारे पापडाचे बॅटर रेडी झाले आहे.
आता दोन प्लास्टिकचे काप करून घ्या, प्लास्टिकवर तेलाने ग्रीस करा. एका प्लास्टिकवर तयार पापडाचे बॅटर गोलाकार करून ठेवा. त्यावर दुसरे प्लास्टिक ठेवा. त्यावर एक मोठी प्लेट ठेऊन हलक्या हाताने दाब द्या. याने पापडाच्या बॅटरला गोल आकार येईल. आता हे पापड सुकवण्यासाठी दुसऱ्या प्लास्टिकवर ठेवा. उन्हामध्ये या पापडांना चांगले सुकवून घ्या. अशा प्रकारे, राजस्थानी स्टाईल खिचियापापड रेडी.
तीन डाळींचे सांडगे करण्याची पाहा पारंपारिक पद्धत, करायला सोपे आणि पौष्टिक
आपण हे पापड वर्षभारासाठी स्टोर करून ठेऊ शकता. पापड तळण्यासाठी आधी गरम तेल करून घ्या, त्यात हे पापड तळून घ्या. हे पापड तळून झाल्यानंतर दुपट्टीने फुलतील.