Lokmat Sakhi >Food > रोज डाळ भात खाऊन कंटाळलात? भाताबरोबर खायला १० मिनिटात करा गरमागरम रस्सम

रोज डाळ भात खाऊन कंटाळलात? भाताबरोबर खायला १० मिनिटात करा गरमागरम रस्सम

How to Make Rasam at Home : साऊथ इंडीयन स्टाईल रस्सम बनण्याची सोपी रेसेपी पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 11:12 AM2023-02-01T11:12:00+5:302023-02-01T11:15:01+5:30

How to Make Rasam at Home : साऊथ इंडीयन स्टाईल रस्सम बनण्याची सोपी रेसेपी पाहूया.

How to Make Rasam at Home : Tomato Rasam Recipe quick and easy Rasam Recipe | रोज डाळ भात खाऊन कंटाळलात? भाताबरोबर खायला १० मिनिटात करा गरमागरम रस्सम

रोज डाळ भात खाऊन कंटाळलात? भाताबरोबर खायला १० मिनिटात करा गरमागरम रस्सम

Highlightsडोसे, सांबार, अप्पम असे पदार्थ चेंज म्हणून खायला बरे वाटतात. साऊथ इंडियन पदार्थ भारतातल्या घराघरांमध्ये फक्त नाश्त्यालाच नाही तर दोन्ही वेळच्या जेवणांमध्येही आवडीनं खाल्ले जातात.

रोज रोज डाळ भात खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खावंसं वाटतं.  डाळ भात किंवा खिचडीपेक्षा काही नवीन ट्राय करायची इच्छा होते तेव्हा पुलाव, बिर्याणी असे पदार्थ ट्राय केले जातात. (Cooking Hacks) साऊथ इंडियन पदार्थ भारतातल्या घराघरांमध्ये फक्त नाश्त्यालाच नाही तर दोन्ही वेळच्या जेवणांमध्येही आवडीनं खाल्ले जातात. डोसे, सांबार, अप्पम असे पदार्थ चेंज म्हणून खायला बरे वाटतात. भाताबरोबर खाण्यासाठी साठी तुम्ही डाळीऐवजी रस्सम बनवू शकता. साऊथ इंडीयन स्टाईल रस्सम बनण्याची सोपी रेसेपी पाहूया. (How to Make Rasam)

साहित्य

एक कप तूर डाळ

2 टीस्पून चिंच

1 टीस्पून तिखट

1 टीस्पून रस्सम मसाला

1 टीस्पून सांभार मसाला

1 टीस्पून गूळ

चवीपुरते मीठ

1/2 टीस्पून मोहरी

1/2 टीस्पून उडीद डाळ

1/4 टीस्पून हिंग

1/8 टीस्पून हळद

6-7 मेथी दाणे

2 टेबलस्पून तेल

8 ते 10 कढीपत्ता

 साहित्य

१) सगळ्यात आधी डाळ व्यवस्थित धुवून घ्या. प्रेशर कुकरमध्ये ठेवा एक कप पाणी घालून शिजवा. डाळ शिजल्यावर पाणी काढून घ्या. 

२) एका भांड्यात टोमॅटो उकडून घ्यावेत व थंड झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्या. अर्धा कप गरम पाणी त्यात चिंच भिजत ठेवावी. दहा मिनिटांनी चिंचेचा कोळ काढा. 

३) पातेल्यात तेल गरम करा. उडीद डाळ, मेथी दाणे घाला. नंतर मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता घाला. यामध्ये वाटलेले टोमॅटोचे मिश्रण व शिजवून घोटून घेतलेली डाळ घाला.

४) यात चिंचेचा कोळ, मीठ, गूळ घालून एकजीव करा. यात तिखट सांभार मसाला, रस्सम मसाला घालून पाच मिनिटे उकळवावे. चव पाहून तिखट, मीठ, चिंच गरजेनुसार आणखी घालावे.

५) रस्सम भाताबरोबर किंवा नुसता सुपसारखा प्यायलाही खुपच छान लागतो.

Web Title: How to Make Rasam at Home : Tomato Rasam Recipe quick and easy Rasam Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.