आपल्यापैकी सगळ्यांच्याच घरात नाश्त्याला डोसा केला जातो. 'डोसा' हा एक पदार्थ असला तरीही त्याचे असंख्य वेगवेगळे प्रकार आहेत. साधा डोसा, म्हैसूर डोसा, मसाला डोसा अशा अनेक वेगवेगळ्या चवीचे डोसे आपण आवडीने खातो. डोसा करायचा म्हटलं की, डाळ - तांदुळ यांसोबतच अनेक पदार्थ काही तासांसाठी पाण्यांत भिजत ठेवावे (How to Make a Restaurant-Style Crispy Rava Dosa at Home) लागतात. तसेच डाळ - तांदुळ भिजल्यानंतर ते मिक्सरमध्ये (How to make rava dosa more crispy) वाटून त्याचे पीठ काढावे लागते. असे पीठ आंबवण्यासाठी ६ ते ७ तास झाकून ठेवावे लागते. अशी डोसा तयार करण्याची खूप मोठी पद्धत असते. परंतु जर आपल्या डोसा खाण्यासाठी इतका सगळा खटाटोप न करता (Tips To Make Rava Dosa More Crispy) अगदी झटपट इन्स्टंट तयार होणारा डोसा करायचा असेल तर 'रवा डोसा' (Instant Crispy Rava Dosa) हा एक डोशाचा उत्तम प्रकार आहे.
रवा डोसा घरात उपलब्ध असणाऱ्या अगदी कमीत कमी साहित्यात देखील पटकन तयार करता येतो. याचबरोबर सकाळच्या घाई गडबडीत जर नाश्ता करायला वेळ नसेल तर आपण हा पटकन तयार होणारा डोसा करु शकतो. रवा डोसा हा क्रिस्पी - कुरकुरीत असेल तरच तो खायला अधिक चांगला लागतो. पण काही सोप्या टिप्स लक्षात ठेवून आपण नेहमीचाच रवा डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत करु शकतो. रवा डोसा क्रिस्पी होण्यासाठी नेमकं काय करावं ते पाहा.
रवा डोसा क्रिस्पी - कुरकुरीत होण्यासाठी ५ टिप्स...
१. रवा डोसा करताना रव्यात दही मिसळा.
रवा डोसा करण्यापूर्वी रव्यात अर्धा कप दही मिसळा. रव्यात दही मिसळल्यानंतर २ ते ३ तास हे मिश्रण झाकून ठेवा. असे केल्याने या मिश्रणातील दह्यामुळे राव डोशाचे पीठ थोडे आंबेल आणि यामुळे डोसा अधिक टेस्टी आणि क्रिस्पी होण्यास मदत होईल.
हिवाळ्यात खा ‘हुरडा भजी’, खास गावरान बेत, पारंपरिक पौष्टिक रेसिपी-थंडीतला अस्सल गावरान बेत...
२. हलकेच बेसन मिसळल्याने येईल छान चव.
रवा डोसा करताना त्यात थोडे बेसन घालावे. जर तुम्ही १ कप रवा घेतला असेल तर त्यात एक चथुर्तांश कप इतके बेसन घालावे. बेसन घातल्याने रवा डोसा अधिक क्रिस्पी आणि कुरकुरीत तर होईल शिवाय चवीला देखील खूप छान लागेल.
३. तांदुळाचे पीठ घातल्याने रवा डोसा होईल अधिक क्रिस्पी - कुरकुरीत.
रवा डोसा हा चवीला खूप छान लागतोच शिवाय यात बेसन आणि तांदुळाचे पीठ घाल्याने त्याची चव आणखीनच वाढते. रवा डोस्याचे पीठ भिजवताना त्यात चमचाभर तांदुळाचे पीठ घालावे. तांदुळाच्या पीठाने डोशाला कुरकुरीतपणा येण्यास अधिक मदत होते.
काळ्या-पिवळ्या-लाल की हिरव्या, कोणत्या मनुका खाणं जास्त फांयद्याचं? मनुका-बेदाणे खावे नक्की कधी?
४. पीठ जास्त पातळ करु नका.
काहीजण रवा डोसा तयार करताना त्यात जास्तीचे पाणी घालून पीठ पातळ करुन डोसा तयार करतात. परंतु असे न करता पीठ जास्त घट्ट किंवा पातळ न करता मध्यम कंन्सिस्टंसीचे बॅटर तयार करून घ्यावे. जर आपण कच्च्या भाज्या मिक्स करून रवा डोसा तयार करत असाल तर पीठ जास्त पातळ करु नका.
५. आपल्या आवडीनुसार कच्च्या भाज्या मिक्स करा.
रव्याच्या पिठात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किसलेलं गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची किंवा कांदा मिक्स करु शकता. आपण आपल्या आवडी प्रमाणे इतरही भाज्या देखील मिक्स करून तुमचा राव डोसा अधिक चविष्ट आणि पौष्टिक करु शकता. भाज्या चिरताना त्या बारीक चिरुन, किसून किंवा कापून घ्याव्यात.