Join us  

नवीन पद्धतीनं १० मिनिटात करा रवा इडली;  मऊ, फुगणाऱ्या इडल्यांची एकदम सोपी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 9:20 AM

How to Make Rava Idli in 10 minutes with a new method;

नाश्त्यासाठी इडली चटणी, इडली सांभार किंवा इडली चिल्ली असे साऊथ इंडियन पदार्थ अनेकांना खायला आवडता. नाश्त्याला असे चवदार पदार्थ असतील पोटभर नाश्ता करता येतो. इडली बनवायचं म्हणजे पीठ आंबवणं, पीठ दळणं ही प्रक्रिया करावी लागते म्हणून काहीजण इडली, डोसा हे पदार्थ घरी न बनवता बाहेरचे  आणून खातात. (A super easy recipe for soft, puffy idlis) पण रवा इडली बनवणं एकदम सोपं आहे. यासाठी तुम्हाला पीठ आंबवण्यासाठी सात ते आठ तास पाट पाहायची काहीच गरज नाही अगदी १० मिनिटात रवा इडली बनून तयार होईल. रवा इडली बनवण्याची सोपी पद्धत पाहूया. (How to Make Rava Idli in 10 minutes)

रवा इडली कशी बनवायची?

साहित्य

रवा  - २५० ग्रॅम 

दही - 300 ग्रॅम 

पाणी - 50 ग्रॅम 

मीठ - चवीनुसार 

एनो - 3/4 टीस्पून

तेल - 1 टेबलस्पून 

कृती

सर्व प्रथम दही फेटून घ्या. आता एका भांड्यात रवा घेऊन त्यात दही घालून मिक्स करा. त्यात पाणी आणि मीठ घालून फेटून घ्या. आता मिश्रण 20 मिनिटे ठेवा. 20 मिनिटांनंतर मिश्रणात सोडा घाला आणि चांगले मिसळा. मिश्रण जास्त घट्ट नसावे आणि फार पातळ नसावे. त्यामुळे इडली स्पॉन्जी होत नाही. कुकरमध्ये २ छोटे ग्लास पाणी टाकून गॅसवर ठेवा, पाणी गरम होऊ द्या. इडली स्टँडला थोडं तेल लावून ग्रीस करा.

१ कप तांदळाचे करा १० ते १५ जाळीदार डोसे; १० मिनिटात तयार होतील मऊ मस्त डोसे

इडलीच्या प्रत्येक भागात चमच्याने मिश्रण भरा. एका वेळी 12 किंवा 18 इडल्या तयार होतील. हे इडली स्टँडच्या आकारावर अवलंबून असते. कुकरमध्ये इडली स्टँड ठेवा आणि झाकण लावा, पण झाकणाची शिटी काढा. इडली 8 किंवा 10 मिनिटांत शिजते नंतर कुकरचे झाकण उघडा. चमच्याच्या टोकाला मिश्रण चिकटले नाही तर इडली तयार आहे.  इडली प्लेटमध्ये ठेवून सर्व्ह करा.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न