Lokmat Sakhi >Food > ना पाक करण्याची झंझट, ना लाडू फसण्याची भीती, झटपट करा रव्याचे लाडू!

ना पाक करण्याची झंझट, ना लाडू फसण्याची भीती, झटपट करा रव्याचे लाडू!

How To Make Rava Ladoo In Less Than 30 Minutes पाक न करता रव्याचे छान मऊ, तोंडात टाकताच विरघळणारे परफेक्ट लाडू, पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2023 06:06 PM2023-05-08T18:06:23+5:302023-05-08T19:21:53+5:30

How To Make Rava Ladoo In Less Than 30 Minutes पाक न करता रव्याचे छान मऊ, तोंडात टाकताच विरघळणारे परफेक्ट लाडू, पाहा रेसिपी

How To Make Rava Ladoo In Less Than 30 Minutes | ना पाक करण्याची झंझट, ना लाडू फसण्याची भीती, झटपट करा रव्याचे लाडू!

ना पाक करण्याची झंझट, ना लाडू फसण्याची भीती, झटपट करा रव्याचे लाडू!

सण - समारंभ म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच. पण सणवार नसेल तर गोड - चमचमीत पदार्थ खाऊ नये का? लाडू हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ. लाडू अनेक प्रकारचे केले जातात. शेवचे लाडू, रव्याचे लाडू, बेसनचे लाडू, बुंदीचे लाडू, लाडूचे अनेक प्रकार महाराष्ट्रात फार फेमस आहे. अनेकांना रव्याचे लाडू फार आवडतात.

रव्याचे लाडू करण्यासाठी त्याला लागणारं साहित्यांचे योग्य प्रमाण माहित असणं गरजेचं आहे. काही लोकं रव्याचे लाडू दुकानातून विकत आणतात. पण विकतचे लाडू आणण्यापेक्षा घरगुती साहित्यात लाडू तयार करा. उन्हाळ्यात मुलं खेळून आल्यानंतर त्यांना छोटी भूक लागते, भूक भागवण्यासाठी हे पौष्टीक लाडू घरात तयार करा. हे लाडू घरातील सदस्यांना नक्कीच आवडतील(How To Make Rava Ladoo In Less Than 30 Minutes).

रव्याचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

तूप

ड्रायफ्रुट्स

आपल्या माणसांसाठी प्रेमाने करा मोहब्बत - ए - शरबत, रिफ्रेशिंग ज्यूस - उन्हाचा त्रास करेल छुमंतर

पिठी साखर

वेलची पूड

अशा पद्धतीने करा रव्याचे लाडू

सर्वप्रथम, एका भांड्यात ५ टेबलस्पून तूप गरम करण्यासाठी ठेवा, तूप गरम झाल्यानंतर त्यात रवा घालून भाजून घ्या. रव्याला सोनेरी रंग येत नाही तो पर्यंत खरपूस भाजून घ्या. रवा भाजून झाल्यानंतर एका परातीत काढून घ्या, त्यात पिठी साखर, वेलची पूड, व गरम तूप घालून मिश्रण एकजीव करा.

हॉटेलसारखा गोलगरगरीत छिद्र असलेला मेदूवडा करायचाय? १ पळी फक्त हवी, सॉफ्ट-हलका मेदूवडा तयार

मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात आवडीनुसार सुकामेवा घाला. व रवा गरम असतानाच त्याचे लाडू वळुन घ्या. अशा प्रकारे झटपट रव्याचे लाडू खाण्यासाठी रेडी. 

Web Title: How To Make Rava Ladoo In Less Than 30 Minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.