Join us  

मैदा नको तर दिवाळीत करा रव्याची शंकरपाळी; हेल्दी आणि खुसखुशीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 2:00 PM

How To Make Rava or Suji Shankarpali Diwali Faral : मैद्याची शंकरपाळी जितकी खुसखुशीत होतात तितकीच रव्याची शंकरपाळीही खुसखुशीत होतात.

ठळक मुद्देफराळातील महत्त्वाच्या पदार्थांपैकी एक असलेल्या शंकरपाळ्यांसाठी आपण मैद्याऐवजी रवा आवर्जून वापरु शकतो. पाहा रव्याच्या शंकरपाळ्यांची सोपी रेसिपी...

दिवाळी म्हटली की घरातील महिलांची खरेदी, साफसफाई, फराळ अशा सगळ्या गोष्टींची लगबग सुरू असते. एकीकडे फराळाच्या पदार्थांचीही तयारी सुरू झालेली असते. फराळाचे पदार्थ म्हटले की ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवेत यासाठीही महिलांचा प्रयत्न सुरू असतो. फराळाच्या पदार्थांमध्ये शंकरपाळी, करंजी किंवा आणखी काही पदार्थांसाठी आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मैदा. मात्र काही जणांना पथ्य असते म्हणून तर काही जण आरोग्याच्या बाबतीत खूप जागरुक असतात म्हणून त्यांना मैदा खायचा नसतो (How To Make Rava or Suji Shankarpali Diwali Faral). 

(Image : Google)

अशावेळी शंकरपाळी कशाची करायची असा प्रश्न गृहीणींना पडू शकतो. तर फराळातील महत्त्वाच्या पदार्थांपैकी एक असलेल्या शंकरपाळ्यांसाठी आपण मैद्याऐवजी रवा आवर्जून वापरु शकतो. मैद्याची शंकरपाळी जितकी खुसखुशीत होतात तितकीच रव्याची शंकरपाळीही खुसखुशीत होतात. यासाठी पदार्थांचे प्रमाण काय घ्यायचे, ती करायची कशी हे समजून घेणे आवश्यक असते. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला मैद्याचा वापर न करता सगळ्यांना खाता येतील आणि चविष्ट होतील अशी रव्याची शंकरपाळी कशी करायची ते पाहूया...

साहित्य -

१. रवा - १.५ वाटी 

२. तूप - अर्धी वाटी 

३. पिठीसाखर - पाऊण वाटी 

४. दूध - पाव वाटी 

५. मैदा - पाव वाटी 

६. तेल - तळण्यासाठी २ ते ३ वाट्या 

(Image : Google)

कृती - 

१. रवा चाळून मिक्सरमधून बारीक करुन घ्या, त्यामुळे त्याचे पीठ होते आणि शंकरपाळ्यासाठी ते अतिशय चांगले एकजीव मळता येते.

२. बारीक केलेल्या या रव्यात तूप पातळ करुन घालावे. त्यानंतर ते थोडे हलवून त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे कमी-अधिक पिठीसाखर घालावी.

३. आपण जरी रव्याची शंकरपाळी करत असलो तरी पीठ एकजीव मळले जाण्यासाठी त्यात थोडासा मैदा घालावा.

४. हे पीठ मळताना आपण पाण्याचा वापर करत नाही, त्यामुळे हे पीठ दूधात मळावे. पीठ मळताना आवश्यकतेनुसार थोडेथोडे दूध घालून पीठ मळावे.  

५. पीठ चांगले मळून झाल्यानंतर त्याचे गोळे करुन पोळपाटावर  पोळ्या लाटून घ्याव्यात. 

६. आपल्याला आवडतील तशा लहान-मोठ्या आकाराची थोडी जाडसर शंकरपाळी लाटावीत. 

७. ही शंकरपाळी तेलात लालसर रंगावर तळावीत, अतिशय खुशखुशीत होतात. 

 

टॅग्स :अन्नदिवाळी 2022पाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.