गुढीपाडव्याला सर्वांच्याच घरी श्रीखंड पुरीचा बेत असतो. रात्रीच्या जेवणात बदल म्हणून किंवा नैवेद्यासाठी रव्याचा शीरा बनवू शकता. रव्याचा शीरा काहीजणांच्या घरी दर २ ते ३ दिवसांनी बनतो तर काहीजण रव्याच्या शीरा बनवण्यापेक्षा खीर, हलवा असे पदार्थ खातात. (Rava sheera recipe suji ka halwa) रव्याचा शीरा बनवण्याची नवीन पद्धत वापरली तर घरातील सगळेजण आवडीनं खातील. यासाठी तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही. कमीत कमी वेळात, कमी खर्चात छान, चवदार पदार्थ तयार होईल. (How to make Rava Sheera)
१) रव्याचा शीरा बनण्यासाठी सगळ्यात एका कढईत तूप घेऊन ड्रायफ्रुट्स तळून घ्या. कारण ड्रायफ्रुट्स न तळता घातल्यास कुरकुरीत लागत नाहीत.
२) ड्रायफ्रुट्स तळल्यानंतर त्याच कढईत तूप गरम करून रवा भाजून घ्या. त्यात १ चमचा बेसन पीठ घाला. हे मिश्रण सतत ढवळत राहा. अन्यथा कढईला चिकटण्याची भिती असते.
३) वेलची बारीक करून पावडर बनवून घ्या. किंवा तुमच्याकडे वेलची पूड तयार असेल तर ती रवा आणि बेसनाच्या मिश्रणात घाला. रवा चांगला भाजल्यानंतर त्यात गरम पाणी घाला. ढवळल्यानंतर त्यात केशरचं पाणी घाला.
४) रवाचं मिश्रण घट्ट झाल्यानंतर सगळ्यात शेवटी यात साखर घाला. साखर वितळल्यानंतर यात ड्राय फ्रुट्स घालून एकजीव करा. मंद आचेवर ५ मिनिटं झाकून टेवा नंतर गॅस बंद करा.