Lokmat Sakhi >Food > आता घरीच करा कच्च्या केळीचे चिप्स, खा कुडूमकुडूम कुरकुरीत चिप्स भरपूर ! जंकफूड खाण्याचा गिल्टही कमी...

आता घरीच करा कच्च्या केळीचे चिप्स, खा कुडूमकुडूम कुरकुरीत चिप्स भरपूर ! जंकफूड खाण्याचा गिल्टही कमी...

HOW TO MAKE RAW BANANA FRENCH FRIES AT HOME : कच्च्या केळीचे फिंगर चिप्स करायला सोपे आणि कुरकुरीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2023 03:07 PM2023-09-07T15:07:32+5:302023-09-07T15:24:20+5:30

HOW TO MAKE RAW BANANA FRENCH FRIES AT HOME : कच्च्या केळीचे फिंगर चिप्स करायला सोपे आणि कुरकुरीत...

How to make raw banana finger chips fried at Home. | आता घरीच करा कच्च्या केळीचे चिप्स, खा कुडूमकुडूम कुरकुरीत चिप्स भरपूर ! जंकफूड खाण्याचा गिल्टही कमी...

आता घरीच करा कच्च्या केळीचे चिप्स, खा कुडूमकुडूम कुरकुरीत चिप्स भरपूर ! जंकफूड खाण्याचा गिल्टही कमी...

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी एक स्नॅक्स डिश म्हणजे फिंगर्स चिप्स. बरेचदा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा इतरवेळी भूक लागली म्हणून स्नॅक्ससाठी फिंगर्स चिप्स (Kacche Kele ke french fries recipe) हा उत्तम पर्याय आहे. शक्यतो फिंगर्स चिप्स हे बटाट्याचे बनवले जातात. हा पदार्थ चवीला चटकदार आणि खायला मसालेदार लागतो.

आपल्याकडे विविध ठिकाणी फिंगर्स चिप्स वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. उपवास असताना देखील फराळ म्हणून आपण बटाट्याचे फिंगर्स चिप्स खाणे पसंत करतो. फिंगर्स चिप्स भारतातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ मानला जातो. आतापर्यंत आपण फक्त बटाट्याचेच फिंगर्स चिप्स खाल्ले असतील. असे असले तरीही आरोग्याच्या दृष्टीने काही हेल्दी खायचे म्हटले की, आपण कच्च्या केळ्याचे हेल्दी फिंगर्स चिप्स (Raw banana French fries) देखील खाऊ शकतो. यात विविध प्रकारचे पौष्टिक घटक असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे असतात. कच्च्या केळ्याचे हेल्दी फिंगर्स चिप्स (Raw Banana Finger Chips) बनवण्याची सोपी कृती पाहूयात(How to make raw banana finger chips fried at Home).

साहित्य :- 

१. कच्ची केळी - २ ते ३
२. मीठ - चवीनुसार 
३. पाणी - २ कप 
४. हळद - १/४ टेबलस्पून 
५. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून 
६. जिरे पावडर - १/४ टेबलस्पून  
७. चाट मसाला - १ टेबलस्पून 
८. सुंठ पावडर - १/२ टेबलस्पून 
९. तेल - ४ ते ५ टेबलस्पून (तळण्यासाठी)

एक थेंब ही तेल न वापरता फाफडा करता येतो ? पाहा, बिनतेलाची कुरकुरीत फाफडा रेसिपी...

पेरी -पेरी मखाणा मिक्स - सायंकाळी खा, वजनही वाढणार नाही आणि चटकमटक खाताही येईल !

कृती :- 

१. सर्वप्रथम कच्च्या केळ्याच्या साली काढून त्याचे फिंगर्स चिप्सच्या आकारात उभे तुकडे करुन घ्यावेत. 
२. आता एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात प्रत्येकी एक टेबलस्पून मीठ व हळद टाकून घ्यावे. 
३. या हळद - मिठाच्या पाण्यांत हे कच्च्या केळ्याचे फिंगर्स चिप्स घालून २ ते ३ मिनिटे पाण्यांत व्यवस्थित भिजवून घ्यावेत. 
४. या पाण्यांत भिजवून झाल्यानंतर हे फिंगर्स चिप्स एका सुती कापडावर काढून कोरडे करुन घ्यावेत. 

उरलेले पनीर फ्रिजमध्ये ठेवले तरी लगेच शिळे - पिवळे दिसते, १ सोपी ट्रिक- पनीर राहील ताजे फ्रेश!

उरलेला शिळा ब्रेड ताजा करण्याची १ जादूई ट्रिक, शेफ पंकज भदौरिया सांगतात...

५. एका मोठ्या कढईमध्ये तेल तापत ठेवावे या तापलेल्या कढईत कच्च्या केळ्याचे फिंगर्स चिप्स सोडून ते खरपूस तळून घ्यावेत. 
६. एक मोठ्या बाऊलमध्ये हळद, लाल तिखट मसाला, जिरे पावडर, चाट मसाला, सुंठ पावडर घालून एकत्रित मसाला तयार करून घ्यावा. 
७. या मसाल्यात खरपूस तळून घेतलेले फिंगर्स चिप्स मसाला कोटिंग करण्यासाठी घालावेत. 

नूडल्स करताना चिकट लगदा होतो ? शेफ पंकज भदोरिया सांगतात १ सोपी ट्रिक, नूडल्स होतील मस्त मोकळ्या...

कच्च्या केळ्याचे हेल्दी फिंगर्स चिप्स खाण्यासाठी तयार आहेत.

Web Title: How to make raw banana finger chips fried at Home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.