Lokmat Sakhi >Food > करकरीत कैऱ्यांचा सिझन संपण्यापूर्वी करा कैरीचा पराठा, वेगळी चव वर्षभर आठवत राहील

करकरीत कैऱ्यांचा सिझन संपण्यापूर्वी करा कैरीचा पराठा, वेगळी चव वर्षभर आठवत राहील

कैरीचा सीझन संपण्याच्या आत कैरीचा पराठा (raw mango paratha) खावून पाहायलाच हवा. ऐकायल विचित्र वाटत असला तरी कैरीचा पराठा लागतो एकदम वेगळा आणि भारी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 10:10 AM2022-06-29T10:10:26+5:302022-06-29T10:15:02+5:30

कैरीचा सीझन संपण्याच्या आत कैरीचा पराठा (raw mango paratha) खावून पाहायलाच हवा. ऐकायल विचित्र वाटत असला तरी कैरीचा पराठा लागतो एकदम वेगळा आणि भारी.

How to make raw mango paratha? | करकरीत कैऱ्यांचा सिझन संपण्यापूर्वी करा कैरीचा पराठा, वेगळी चव वर्षभर आठवत राहील

करकरीत कैऱ्यांचा सिझन संपण्यापूर्वी करा कैरीचा पराठा, वेगळी चव वर्षभर आठवत राहील

Highlightsकैरीचा कीस कणकेत मिसळून दशम्यासारखा किंवा कणकेच्या लाटीत कैरीचा कीस भरुन सारणाच्या पराठ्यासारखा अशा दोन्ही प्रकारे कैरीचा पराठा करता येतो. 

पराठे म्हटलं की त्याचे अनेक चविष्ट प्रकार करता येतात. पराठ्यांचे प्रकार सीझनप्रमाणे मिळणाऱ्या भाज्यांनुसार बदलतात देखील. बटाट्याचे, मिश्र भाज्यांचे, कांद्याचे, पालक बिटाचे, नुसते तिखट मिठाचे पराठे हे नेहमीचे पराठे जे आपण आलटून पालटून करत राहातो. पराठ्यांचे तेच तेच प्रकार सोडून  नवीन प्रकार करुन पाहायचा असल्यास कैरीचा पराठा (raw mango paratha)  अवश्य करुन पाहावा. कैरीचा सीझन संपण्याच्या आत कैरीचा पराठा खावून पाहायलाच हवा. ऐकायल विचित्र वाटत असला तरी कैरीचा पराठा लागतो एकदम वेगळा आणि भारी. कैरीचा पराठा करायला (how to make raw mango paratha) फारशी सामग्रीही लागत नाही. 

Image: Google

कैरीचा पराठा कसा करावा?

कैरीचा पराठा करण्यासाठी 2कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, अर्धा कप कैरीचा कीस आणि तेल घ्यावं. कैरीचा पराठा करण्यासाठी कैरी धुवून, किसून घ्यावी. कणकेत मीठ, कैरीचा कीस आणि 2 चमचे तेल घालून कणीक चांगली मळून घ्यावी. 
कणीक मळल्यानंतर थोड्या वेळ सेट होवू द्यावी. नंतर कणकेची मध्यम आकाराची लाटी घ्यावी. ती थोडी मोठी करुन त्यात थोडा कैरीचा कीस घालून लाटी बंद करुन पोळी लाटतो त्याप्रमाणे पराठा लाटून घ्यावा.

Image: Google

तवा गरम करुन घ्यावा. तव्याला तेल लावून पराठा टाकून तो दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर शेकून घ्यावा. कैरीचा हा आंबटसर चटपटीत पराठा तिखटसर चटणीसोबत छान लागतो. कैरीचा पराठा करताना संपूर्ण किसलेली कैरी कणकेत मिसळून ज्याप्रमाणे दशम्या करतो त्याप्रमाणे पराठा केला तरी चालतो. पण सारणाच्या पराठ्याचा फील देण्यासाठी किसलली कैरी भरुन पराठा केला तर असा पराठा छान दणदणीत लागतो. 

 

Web Title: How to make raw mango paratha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.