उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे बऱ्याच घरांत लोणचं घालूनही झालं आहे. हिरव्याकंच करकरीत कैरीचं लोणचं घालण्याचा शेवटचा टप्पही आता संपत आला आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही लोणचं घातलेलं नाही, त्यांची आता गडबड सुरू झाली आहे. भरपूर तेल घालून लोणचं करण्याची पद्धत आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात दिसते. पण आता तब्येतीमुळे अनेक जण तेल कमीतकमी प्रमाणात खातात (how to make raw mango pickle without using oil). म्हणूनच आता लोणचंही बिना तेलाचं करा. जेणेकरून तब्येतीची काळजी न करता त्याचा मनसोक्त आस्वाद घेता येईल. बघा थेंबभरही तेल न घालता होणाऱ्या लोणच्याची रेसिपी...(aam ka achar recipe without adding oil)
तेल न घालता कैरीचं लोणचं करण्याची रेसिपी
साहित्य
५ किलो कैरी
१०० ते १५० ग्रॅम हळद,
१०० ग्रॅम लवंग,
५० ग्रॅम मेथ्या,
४०० ते ५०० ग्रॅम लोणचं मसाला
अर्धा किलो मीठ.
लोणच्याची रेसिपी
लोणच्यासाठी असणाऱ्या कैरीच्या फोडी स्वच्छ धुवून एका स्वच्छ कपड्याने पुसून कोरड्या करा.
लवंग आणि मेथ्या मंद आचेवर कढईत थोड्या भाजून घ्या. त्यानंतर त्या थंड झाल्या की मिक्सरमधून त्याची बारीक पावडर करून घ्या.
हा मसाला एका भांड्यात काढा. त्यात हळद, मीठ आणि विकतचा लोणचे मसाला टाका.
गुलाबाच्या रोपाला फुलं येणं कधीच बंद होणार नाही, 'हे' खास पाणी घाला, गुलाब भरभरुन फुलेल
यानंतर थोड्या- थोड्या फोडी घेऊन या मसाल्यामध्ये चांगल्या घोळून घ्या आणि बरणीत भरा.
सुरुवातीचे ८ ते १५ दिवस हे लोणचं दररोज हलवून घ्या. जेणेकरून ते खराब होणार नाही. किंवा खराब होत असेल असं दिसलं तर त्याचा बुरसटलेला भाग लगेच काढून टाकता येईल.