Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात व्हायलाच पाहिजे कैरीचं आंबट- गोड पन्हं, बघा पन्हं करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी

उन्हाळ्यात व्हायलाच पाहिजे कैरीचं आंबट- गोड पन्हं, बघा पन्हं करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी

How To Make Raw Mango Drink: कैरीच्या पन्ह्याशिवाय उन्हाळ्याची काय मजा.. म्हणूनच पाहून घ्या ही पन्हं करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी. (kairicha panha recipe in marathi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2024 09:14 AM2024-03-27T09:14:28+5:302024-03-27T09:15:01+5:30

How To Make Raw Mango Drink: कैरीच्या पन्ह्याशिवाय उन्हाळ्याची काय मजा.. म्हणूनच पाहून घ्या ही पन्हं करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी. (kairicha panha recipe in marathi)

How to make raw mango sharbat, kairicha panha recipe, how to make raw mango drink, raw mango panha sarbat recipe in marathi | उन्हाळ्यात व्हायलाच पाहिजे कैरीचं आंबट- गोड पन्हं, बघा पन्हं करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी

उन्हाळ्यात व्हायलाच पाहिजे कैरीचं आंबट- गोड पन्हं, बघा पन्हं करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी

Highlightsहा पल्प तुम्ही एखाद्या बरणीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता. गुळाचा पल्प लवकर संपवावा. कैरीचा पल्प मात्र ६ ते ७ दिवस चांगला राहू शकतो.

उन्हाळा जवळ यायला लागला की चाहूल लागते ती कैरीची आणि कैरीपासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची. कैरीचे जे काही वेगवेगळे पदार्थ आहेत, त्यापैकी एक बहुतांश लोकांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे कैरीचं पन्हं. कैरीचं पन्हं वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. आता पन्हं करण्याची ही एक अगदी सोपी रेसिपी पाहूया (How to make raw mango sharbat). या रेसिपीमध्ये आपण कैरीचा पल्प तयार करून फ्रिजमध्ये साठवून ठेवू शकतो. तो पल्पा ४ ते ५ दिवस चांगला राहतो. हा पल्प वापरून ५ मिनिटांत कैरीचं इन्स्टंट पन्हं करता येतं. (raw mango panha sarbat recipe in marathi)

कैरीचं पन्हं करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ मध्यम आकाराची कैरी

१ वाटी गूळ किंवा पाऊण वाटी साखर

तुपामधली भेसळ ओळखण्यासाठी ४ टिप्स

१ टीस्पून वेलची पावडर

१ टीस्पून चाट मसाला

१ टीस्पून मीठ

 

कृती

सगळ्यात आधी कैरी कुकरमध्ये उकडायला लावा.

कैरी उकडली आणि थंड झाली की मग तिचं साल काढून घ्या. सालाला चिकटलेला कैरीचा गर काढून घ्या.

गुलाबाला भरभरून फुलं येतील, फक्त ४ गोष्टी करा, कधीही बिनाफुलाचं राहणार नाही रोप

आता कैरीचा गर, साखर किंवा गूळ, वेलची पावडर हे साहित्य मिक्सरमध्ये टाका आणि चांगलं बारीक करून घ्या.

हा झाला कैरीच्या पन्ह्याचा पल्प तयार. हा पल्प तुम्ही एखाद्या बरणीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता. गुळाचा पल्प लवकर संपवावा. कैरीचा पल्प मात्र ६ ते ७ दिवस चांगला राहू शकतो.

आता जेव्हा तुम्हाला पन्हं करायचं आहे, तेव्हा २ टीस्पून कैरीच्या पन्ह्याचा पल्प घेऊन ग्लासमध्ये टाका. त्यात पाणी टाका. चवीनुसार मीठ टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. कैरीचं गारेगार पन्हं झालं तयार. 
 

Web Title: How to make raw mango sharbat, kairicha panha recipe, how to make raw mango drink, raw mango panha sarbat recipe in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.