Join us  

विकतसारखा फुललेला मस्त रवा ढोकळा घरीच करा; रव्यात ‘हा’ पदार्थ घाला, स्पॉन्जी ढोकळा बनेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 6:00 PM

(How to make Rawa Dhokla : ढोकळा कडक होतो किंवा जास्त आंबट लागतो. रवा ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. घरच्याघरी सोप्या पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवू शकता.

अनेकांना नाश्त्याला ढोकळा खायला आवडतं. (Rawa Dhokla Recipe) ढोकळ्याचे वेगवेगळे प्रकार खाल्ले जातात. रवा ढोकळा, डाळीचा ढोकळा,  तांदळाचा, चण्याच्या पिठाचा ढोकळा असे वेगवेगळे प्रकार सकाळच्या नाश्त्याला लोक आवडीने खातात. घरी बनवलेला ढोकळा व्यवस्थित बनत नाही. (Rava Dhokla kasa karaycha) ढोकळा कडक होतो किंवा जास्त आंबट लागतो. त्यासाठीच  रवा ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. घरच्याघरी सोप्या पद्धतीने तुम्ही इंस्टंट ढोकळा बनवू शकता. (How to make Rawa Dhokla)

साहित्य

१) रवा- १ कप

२) दही- १ कप

३) पाणी - गरजेनुसार

४) हिरवी मिरची पेस्ट- १ टिस्पून

५) मीठ- चवीनुसार

६) पीठी साखर- १ ते २ चमचे

७) इनो- अर्धा ते एक चमचा

८) लाल मिरची पावडर- अर्धा टिस्पून

९) मोहोरी- १ ते २ चमचे

१०) पांढरे तीळ- १ ते २ चमचे

११) कढीपत्ता- ८ ते १०

१२) हिरवी मिरची - १ ते ३

१३) कोथिंबीर- १ ते २ चमचे

कृती

१) रवा ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीत रवा काढून ठेवा.  रव्यात दह्याचं मिश्रण घाला.  दही आणि रव्याचं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.

कुकरमध्ये १० मिनिटांत करा वाटाणा-बटाट्याची भाजी; सोपी चमचमीत रेसिपी-चव एकदम भन्नाट

२) त्यात गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून पातळ पेस्ट बनवून घ्या. त्यात बारीक केलेली मिरची आणि पिठीसाखर, मीठ आणि इनो घाला. एकाच दिशेने मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. ढोकळ्याच्या भांड्याला व्यवस्थित तेल लावून त्यात हे मिश्रण भरा. 

३) त्यानंतर मिश्रण व्यवस्थित एकजीव करून त्यावर एक चिमुटभर लाल तिखट घाला.  त्यानंतर  १० ते १५ मिनिटांसाठी ढोकळा वाफवून घ्या.  फोडणीसाठी तेलात मोहोरीचे दाणे, तीळ, कढीपत्ता, मिरची आणि हिंग घाला.

उरलेल्या भाताचे १० मिनिटांत करा खमंग मेदूवडे; झटपट बनतील कुरकुरीत वडे, पाहा सोपी रेसिपी

४) ढोकळा शिजल्यानंतर चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घ्या. त्यानंतर कोथिंबीर चिरून वरून घाला. यामुळे ढोकळे मऊ तयार होतील.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स