Lokmat Sakhi >Food > लसूण-लाल मिरचीची करा चटपटीत चटणी; गावरान रेसिपी-थंडीत भूक खवळेल, पोटभर जेवाल

लसूण-लाल मिरचीची करा चटपटीत चटणी; गावरान रेसिपी-थंडीत भूक खवळेल, पोटभर जेवाल

How to make Red Chilli Garlic Chutney (lasun lal mirchi chi chutney) : जेवणात बदल म्हणून तुम्ही लाल मिरची आणि लसणाची चटणी ट्राय करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 12:28 PM2023-12-11T12:28:58+5:302023-12-11T23:47:49+5:30

How to make Red Chilli Garlic Chutney (lasun lal mirchi chi chutney) : जेवणात बदल म्हणून तुम्ही लाल मिरची आणि लसणाची चटणी ट्राय करू शकता.

How to make Red Chilli Garlic Chutney : Rajasthani Red Chilli Garlic Chutney Recipe | लसूण-लाल मिरचीची करा चटपटीत चटणी; गावरान रेसिपी-थंडीत भूक खवळेल, पोटभर जेवाल

लसूण-लाल मिरचीची करा चटपटीत चटणी; गावरान रेसिपी-थंडीत भूक खवळेल, पोटभर जेवाल

भारतीय जेवणात चटण्या आणि लोणच्याला फार महत्व आहे. (Cooking Hacks) चपाती, भाकरी किंवा साधा भात कशाही बरोबर तुम्ही चटणी खाऊ शकतात.  खोबऱ्याची चटणी तुम्ही नेहमीच खात असाल. (Garlic Red Chili Chutney South Indian) जेवणात बदल म्हणून तुम्ही लाल मिरची आणि लसणाची चटणी ट्राय करू शकता. (Red chilli garlic chutney) ही चटणी खाल्ल्यास साध्या जेवणाचीही चव वाढते. विशेष म्हणजे कमी साहित्यात आणि कमी वेळेत ही चटणी तयार होते. (lal mirch lahsun ki chatni)

लाल मिरची आणि लसणाच्या चटणीसाठी लागणारं साहित्य (Red Chilli Chutney Making Process)

१) कश्मिरी लाल मिरच्या- १० ते १५

२) लसूण- १०० ग्राम

३) तूप- ५० ग्राम

४) हिंग-१ टिस्पून

५) जीरं- १ टिस्पून

६) मीठ- चवीसनुसार

७) साखर- चवीनुसार

८) लेमन ज्यूस- २ ते ३ चमचे

लसूण-लाल मिरचीची चटणी कशी करायची? (Rajasthani Red Chilli Garlic Chutney Recipe)

१) सगळ्यात आधी काश्मिरी लाल मिरच्याचे देठ काढून मिरच्या एका भांड्यात काढा. त्यात उकळतं पाणी घालून मिरच्या २० ते ३० मिनिटंसाठी भिजवायला ठेवा. नंतर पाटा साफ करून त्यावर मिरच्या ठेवून मिरच्या बारीक वाटून घ्या. यात २० ते २५ लसणाच्या पाकळ्या घालून लसूण सुद्धा बारीक करून घ्या.

उरलेल्या भाताचा करा क्रिस्पी-टेस्टी डोसा; ५ मिनिटांत बनेल डोसा-फोडणीचा भात करणंच विसराल

२) वाटण्यासाठी तुम्ही पाटा वरवंड्याऐवजी खलबत्ता किंवा मिक्सरचाही वापर करू शकता पण पाटा वरवंट्याचा वापर केला तर अस्सल चव येईल. लाल मिरची आणि लसूण वाटून एकजीव केल्यानंतर याची जाडसर पेस्ट एका भांड्यात काढून घ्या. 

३) नंतर एका कढईत तूप गरम करून हिंग घाला. यात वाटलेली चटणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. मग यात जीरं आणि मीठ घालून चटणी शिजवून घ्या. तेल सुटेपर्यंत मंद आचेवर चटणी शिजवून घ्या, यावर झाकण ठेवू नका. कारण वाफेमुळे पाणी तयार होईल. मॉईश्चर आल्यामुळे चटणीला हवी तशी चव येणार नाही.

थंडीत रोज चपातीबरोबर १ गुळाचा खडा खा, हाडं होतील बळकट-हिमोग्लोबिन भरपूर वाढेल

४) २ ते ३ चमचे साखर आणि लिंबू घालून पुन्हा परतवून घ्या.  नंतर गॅस बंद करून चटणी एका स्वच्छ भांड्यात काढून घ्या. तयार आहे झणझणीत लसूण-लाल मिरचीची चटणी.

Web Title: How to make Red Chilli Garlic Chutney : Rajasthani Red Chilli Garlic Chutney Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.