आपल्या भारतीय परंपरेत जेवणाच्या ताटात वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आणि पापड असतात. रोजच्या जेवणासोबत तोंडी लावायला म्हणून पापड, लोणची, चटण्या असे अनेक पदार्थ आपण आवडीने खातो. काहीवेळा जेवणाच्या ताटात आपल्या आवडीची भाजी नसली किंवा रोजच्या त्याच त्या भाज्या, उसळी खाऊन कंटाळा आला, की काहीतरी वेगळं खावंसं वाटत. अशावेळी आपण या तोंडी लावायला म्हणून वाढलेल्या चटण्या, पापड, लोणची यासोबत अगदी पोटभर जेवण करु शकतो(Papad Chutney Recipe).
जेवणाच्या ताटातील पापड म्हणजे घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. मग तो पापड तांदुळाचा असो किंवा उडीदाचा, गरमागरम कुरुरुम कुरुरुम पापड खायला सगळ्यांचं आवडतात. जेवणाच्या ताटात पापड, चटणी असे दोन वेगवेगळे पदार्थ असतात, पण कधी पापडाची चटणी खाल्ली आहे का ? गरमागरम पापड भाजून त्याची मस्त मसालेदार, झणझणीत सुकी चटणी तयार करता येते. शेंगदाण्याच्या किंवा सुक्या खोबऱ्याच्या चटणीप्रमाणेच आपण ही पापडाची चटणी एकदाच तयार करुन स्टोअर करुन ठेवू शकतो. वरण - भात किंवा चपाती, भाकरी सोबत तोंडी लावायला म्ह्णून आपण ही चटणी खाऊ शकतो. भाजलेल्या पापडाची सुकी चटणी कशी तयार करावी याची रेसिपी पाहूयात(How To Make Red Dry Chutney From Papad).
साहित्य :-
१. उडीद डाळीचे पापड - ४ ते ५ पापड (भाजून घेतलेले)
२. कांदा लसूण मसाला - १/२ टेबलस्पून
३. लाल मिरची पावडर - १/२ टेबलस्पून
४. लसूण पाकळ्या - ५ ते ६ पाकळ्या
५. पांढरे तीळ - १ टेबलस्पून (कोरडे भाजून घेतलेले)
६. मीठ - चवीनुसार
७. जिरे - १/२ टेबलस्पून
वडापाव रॅप हा वडापावचा कोणता नवीन प्रकार? दिसतो सुंदर आणि एकदम टेस्टी असा हा अनोखा वडापाव...
पितृपक्षात करतात तशी पारंपरिक तांदुळाची खीर करण्याची सोपी रेसिपी, खीर होईल परफेक्ट - चवीला उत्तम...
कृती :-
१. सगळ्यांत आधी उडदाचे पापड गॅसच्या मंद आचेवर भाजून घ्यावेत.
२. भाजून घेतलेले पापड एका डिशमध्ये घेऊन त्याचा हातांनी दाबून थोडा चुरा करुन घ्यावा.
३. आता मिक्सरचे भांडे घेऊन त्यात हा पापडाचा चुरा घालावा.
भाज्या लवकर शिळ्या - खराब होऊ नयेत म्हणून पाहा सोपी पद्धत, आठवडाभर भाज्या राहतील एकदम फ्रेश...
४. पापडाचा चुरा घातल्यानंतर त्यात कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, लसूण पाकळ्या, भाजून घेतलेले पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, जिरे घालावे.
५. आता हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घातल्यावर मिक्सर फिरवून घेऊन त्याची बारीक पूड करुन घ्यावी.
पापडाची चटणी खाण्यासाठी तयार आहे. चपाती, वरण - भातासोबत तोंडी लावायला म्हणून आपण ही चटणी खाऊ शकता.