छोले- भटुरे हा एखाद्या पार्टीसाठी, छोट्या गेट टुगेदरसाठी अगदी परफेक्ट बेत. शिवाय आवडतोही सगळ्यांना. पण हा बेत करायचा म्हणजे नेमकी अडचण येते ती भटुऱ्यांची. छोले तर आपण अगदी मस्त चवदार करतो. पण भटुरे जसे पाहिजे तसे टम्म फुगणारे (Perfect recipe of baloon like bhatura) आणि त्यात थोडा क्रिस्प असणारे होतच नाहीत. मग शेवटी अशी वेळ येते की ते भटुरे आहेत की पुऱ्या हे कळतच नाही. म्हणूनच ही बघा रेसिपी (How to make restaurant style bhatura?).. मस्त चवदार, खुसखुशीत आणि गोलमटोल फुगलेल्या भटुऱ्यांची (Instant Bhatura recipe). ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या niluskitchen1986 या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
भटुरे करण्याची रेसिपी
साहित्य
एक कप मैदा, मैदा खाणं टाळत असाल तर अर्धी कणिक आणि अर्धा मैदा असे मिश्रण घ्यावे.
१ टीस्पून मीठ
१ टीस्पून साखर
१ टीस्पून बेकिंग सोडा
१ टीस्पून मेथीदाणा पावडर
झुरळांना घराबाहेर काढण्याचा मस्त सुगंधित उपाय, उदबत्तीचा करा खास वापर, बघा १ स्मार्ट ट्रिक
अर्धा कप पाणी
अर्धा कप दूध
गरजेपुरतं पाणी
कृती
१. हे सगळं मिश्रण एका भांड्यात एकत्र करा आणि व्यवस्थित मळून घ्या.
२. गरजेनुसार त्यात थोडं थोडं पाणी टाका.
अस्सल पंजाबी चवीची ढाबास्टाईल दाल- मखनी करा घरीच, ही बघा एक चवदार रेसिपी
३. पीठ खूप सैलसर नसावं आणि खूप घट्टही नसावं.
४. पीठ मळून झाल्यानंतर त्यावर एक स्वच्छ ओला कपडा १० मिनिटांसाठी झाकून ठेवा.
५. त्यानंतर पीठाला तेलाचा हात लावा आणि पुन्हा ५ ते ७ मिनिटे पीठ मळा. जेवढे जास्त पीठ मळाल तेवढे जास्त भटुरे फुगतील.
राधिका मर्चंटचा मेहंदी कार्यक्रमाचा घागरा असा भारी की..... बघा अंबानी परिवाराच्या सुनबाईंचा थाट
६. त्यानंतर पीठाचे छोटे- छोटे गोळे करा आणि मैदा किंवा कणिक लावून भटूरे लाटून घ्या.
७. कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर भटूरे तळून घ्या. भटुरे छान फुगतील आणि त्याचं वरचं कव्हर छान कुरकुरीत होईल.