Lokmat Sakhi >Food > भेळ करा नाहीतर सॅण्डविच, तयार ठेवा चटपटीत ‘हिरवी चटणी !’ चटणी अशी की पदार्थाला येईल झटपट चव...

भेळ करा नाहीतर सॅण्डविच, तयार ठेवा चटपटीत ‘हिरवी चटणी !’ चटणी अशी की पदार्थाला येईल झटपट चव...

Allrounder Green Chutney Recipe : हिरवी मल्टीपर्पज चटणी करण्याची ही घ्या सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2023 04:29 PM2023-11-01T16:29:59+5:302023-11-01T16:52:01+5:30

Allrounder Green Chutney Recipe : हिरवी मल्टीपर्पज चटणी करण्याची ही घ्या सोपी रेसिपी...

How to make Restaurant Style Green Chutney at home, Easy Mint Coriander Chutney at Home | भेळ करा नाहीतर सॅण्डविच, तयार ठेवा चटपटीत ‘हिरवी चटणी !’ चटणी अशी की पदार्थाला येईल झटपट चव...

भेळ करा नाहीतर सॅण्डविच, तयार ठेवा चटपटीत ‘हिरवी चटणी !’ चटणी अशी की पदार्थाला येईल झटपट चव...

'चटणी' या पदार्थाला भारतीय थाळीमध्ये विशेष असे स्थान आहे. कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी चटणी पुरेशी असते. तोंडी लावायला म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या घरात बनवून ठेवतो. या सर्व चटणीच्या प्रकारांत अतिशय लोकप्रिय असणारी व सर्वांना आवडणारी, झटपट होणारी अशी हिरवी चटणी. कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, खोबर असे साधे सोपे साहित्य वापरून ही झटपट चटणी तयार करू शकतो. हिरवी चटणी (Allrounder Green Chutney Recipe) अगदी बेचव जेवणाची देखील चव वाढवते(How to make Green Chutney).

कोथिंबिर - मिरचीची हिरवी चटणी ही मल्टिपर्पज चटणी आहे असे आपण म्हणू शकतो. ही आपण अनेक पदार्थांबरोबर जसे की भेळ, समोसा किंवा कोणत्याही (green chutney for sandwich) चाट, इडली, उत्तपम, किंवा पराठयांबरोबरही खाऊ शकता. ही बनवायला अगदी सोपी आहे व कधीही झटपट बनविता येते. फ्रिज मध्ये ठेवल्यास ही १० ते १५ दिवस चांगली टिकून राहते. हिरवी चटणी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. परंतु प्रत्येक वेळा ही चटणी बनवण्यासाठी वेळ असेलच असे नाही. काहीवेळा कामाच्या घाईगडबडीत किंवा पुरेसे साहित्य नसल्यामुळे आपण ही चटणी (Easy Mint Coriander Chutney at Home)आयत्यावेळी बनवू शकत नाही. अशावेळी एकदाच साहित्य आणून आपण ही चटणी बनवून फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवू शकतो. त्याचबरोबर आपल्याला हवी तेव्हा ही इन्स्टंट चटणी फ्रिजमधून काढून खाऊ शकतो. इन्स्टंट मल्टिपर्पज चटणी बनवण्याची सोपी कृती पाहूयात(How to make Restaurant Style Green Chutney at home).

साहित्य :- 

१. पुदिना - १ जुडी
२. कोथिंबीर - १ जुडी
३. भाजून घेतलेली चणा डाळ - १ 
४. आल्याचा तुकडा - १ इंचाचा लहान तुकडा 
५. लसूण पाकळ्या - ७ ते ८
६. हिरव्या मिरच्या - ३ ते ४
७. मीठ - चवीनुसार 
८. साखर - १ टेबलस्पून 
९. लिंबाचा रस - १ टेबलस्पून 
१०. पाणी - गरजेनुसार

एकाच चवीचे वरण खाऊन कंटाळा आला? मास्टर शेफ पंकज सांगतात, ५ प्रकरच्या फोडण्या - खा चमचमीत...

यंदा गुलाबी थंडीत करा मसालेदार खट्टामिठा पेरु चाट, तोंडाला पाणी सुटेल - घ्या झटपट रेसिपी...

कृती :- 

१. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर, भाजून घेतलेली चणा डाळ, आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, साखर, लिंबाचा रस, गरजेनुसार पाणी घालून घ्यावे. 

दिवाळीच्या सुटीत मुलं म्हणणारच आई आज काय स्पेशल ? पालक - मेथी पुऱ्यांची घ्या झटपट रेसिपी-खुसखुशीत खाऊ...

ना बटाटे उकडण्याची गरज - ना सारणाची भानगड, फक्त १० मिनिटांत करा गरमागरम आलू पराठे...

२. आता हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. 
३. आपल्याला जशी चटणीची कंन्सिस्टंसी हवी त्याप्रमाणे त्यात पाणी घालूंन घ्यावे. 

मेथीची भाजी कडवट होते ? ९ गोष्टी - मेथीची भाजी होईल एकदम चमचमीत - कडू अजिबात लागणार नाही...

आपली मल्टिपर्पज चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही चटणी आपण एकदाच बनवून महिनाभर एका हवाबंद डब्यांत भरुन फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवू शकतो. या चटणीचा वापर आपण भेळ, सँडविच, वडापाव यांसारख्या पदार्थांमध्ये नक्कीच करु शकतो. याबरोबरच जेवणासोबत कधी तोंडी लावायला म्हणून किंवा इडली, डोसा यांसारख्या पदार्थांसोबत ही चटणी खाऊ शकता.

Web Title: How to make Restaurant Style Green Chutney at home, Easy Mint Coriander Chutney at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.