Join us  

मेदूवड्यात मधोमध परफेक्ट छिद्र पाडताच येत नाही? १ सोपी ट्रिक-करा गोल गरगरीत मेदूवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2024 4:27 PM

Tips And Tricks For Perfect Round Shape Medu vada: मेदूवडा करताना हा अनुभव अनेकजणींना येतो. त्यासाठीच ही एक सोपी ट्रिक पाहून घ्या....(how to make restaurant style medu vada of perfect round shape)

ठळक मुद्देमेदूवडे करणार असाल तर सगळ्यात आधी ही एक गोष्ट लक्षात घ्या की वडे करण्यासाठी आपण जे पीठ तयार करणार आहोत, ते घट्ट असणं गरजेचं आहे.

इडली- सांबार, मसाला डोसा, साधा डोसा, उतप्पा हे दक्षिण भारतीय पदार्थ जसे अनेकांना आवडतात तसाच मेदूवडा हा पदार्थही चांगलाच लोकप्रिय आहे. गरमागरम मेदूवडे आणि त्यासोबत वाफाळतं चटकदार सांबार असा मेन्यू असेल तर मग क्या बात है.. पण बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की त्या मेदूवडे करायला गेल्या की ते व्यवस्थित जमतच नाही. एकतर त्या वड्याला मधलं छिद्र पाडायला गेलं तर त्याचा आकार बिघडतो आणि दुसरं म्हणजे व्यवस्थित छिद्र पाडल्या गेलं तरी तो वडा लवकर तेलात पडतच नाही. मग तेल हातावर उडून कधी कधी चटकाही बसतो. तुम्हालाही मेदूवडा करताना अशीच अडचण येत असेल तर ही खास ट्रिक एकदा बघाच...(Tips And Tricks For Perfect Round Shape Medu vada)

 

गोल गरगरीत मेदूवडे करण्याची ट्रिक

मेदूवडे करणार असाल तर सगळ्यात आधी ही एक गोष्ट लक्षात घ्या की वडे करण्यासाठी आपण जे पीठ तयार करणार आहोत, ते घट्ट असणं गरजेचं आहे. ते मुळीच सैलसर भिजवून नका. सैलसर पीठ भिजवलं की वड्यांचा आकार बिघडतो.

कशाला नेलआर्टसाठी हजारो रुपये घालवता? तुमच्याकडच्या नेलपेंट घेऊन घरीच करा सुंदर मार्बल नेल आर्ट

दुसरा उपाय म्हणजे मेदूवडे करण्यासाठी एका ग्लासचा आणि कॉटन कपड्याचा वापर करा.

यासाठी एका ग्लासच्या वरच्या उघड्या भागाला एक ओलसर सुती कपडा पक्का गुंडाळा. या कपड्याची चांगली गाठ बांधा जेणेकरून तो निघणार नाही.

 

आता मेदुवडा करण्यासाठी थोडं पीठ हातावर घ्या आणि ते ग्लासला वरच्या भागावर बांधलेल्या कपड्यावर ठेवून थोडं पसरवा. आता मधोमध एक छिद्र पाडा. पीठ खूप जास्त घेऊ नये. नाहीतर आपण जेव्हा ते पसरवतो तेव्हा ते खाली ओघळून येतं.

नॉन स्टिक भांडी चुकीच्या पद्धतीने वापरल्यास टेफ्लॉन फ्लू होण्याचा धोका! बघा या आजाराची लक्षणं 

आता ज्या भागावर वडा आहे तो भाग अलगद कढईतल्या गरम तेलावर धरा. वडा अलगद तेलात जाईल. अशा पद्धतीने तुम्ही अगदी सहज परफेक्ट आकाराचे गोल गरगरीत मेदूवडे करू शकता. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.