Join us  

रेस्टॉरंटस्टाईल चमचमीत ग्रेव्ही करण्याची रेसिपी, एकाच ग्रेव्हीपासून करा १० वेगवेगळ्या भाज्या- घ्या रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2024 11:59 AM

How To Make Restaurant Style Red Gravy: दिवाळीत पाहुण्यांसाठी करा रेस्टॉरंटस्टाईल चमचमीत भाज्या... त्यासाठीच बघा ग्रेव्ही तयार करण्याची ही खास रेसिपी..(red gravy recipe for 10 different sabji)

ठळक मुद्देकधीही मसालेदार भाज्या खाण्याची इच्छा झाली तर अगदी १० ते १५ मिनिटांत तुम्ही कोणतीही चमचमीत भाजी तयार करू शकाल.

रेस्टॉरंटसारख्या चमचमीत, मसालेदार भाज्या घरच्याघरी करणं तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर ही एक रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघायला पाहिजे. यामध्ये आपण रेस्टॉरंटमध्ये जशी वेगवेगळ्या भाज्यांसाठी असते तशी चवदार ग्रेव्ही कशी करायची ते बघणार आहोत. ग्रेव्ही परफेक्ट जमली की भाजीला आपोआपच छान चव येते. त्यासाठी फक्त ग्रेव्हीमध्ये योग्य पदार्थ योग्य प्रमाणात पडले पाहिजेत. आपण जी रेसिपी पाहणार आहोत, त्या रेसिपीने तयार केलेली ग्रेव्ही तुम्ही जवळपास सगळ्याच मसालेदार भाज्यांसाठी वापरू शकता (how to make restaurant style red gravy?). शिवाय ही ग्रेव्ही तुम्ही एकदा करून ठेवली की ती महिनाभर अगदी फ्रेश राहील. त्यामुळे कधीही मसालेदार भाज्या खाण्याची इच्छा झाली तर अगदी १० ते १५ मिनिटांत तुम्ही कोणतीही चमचमीत भाजी तयार करू शकाल.(red gravy recipe for 10 different sabji)

 

मसालेदार भाज्यांसाठी ग्रेव्ही कशी तयार करावी?

रेस्टॉरंटस्टाईल चमचमीत भाज्या घरीच करण्यासाठी ग्रेव्ही कशी तयार करावी याविषयीची रेसिपी शेफ स्मिता देव यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

साहित्य 

३ ते ४ मध्यम आकाराचे कांदे 

२ टेबलस्पून तेल 

१ टेबलस्पून बटर 

१० ते १२ लसूण पाकळ्या 

अर्धा टेबलस्पून आलं 

 

५ ते ६ हिरव्या मिरच्या

१ टीस्पून हळद आणि लाल तिखट 

५ टोमॅटो 

चकलीचा बेत नेहमीच फसतो- कडक होतात? १ किलो भाजणीची खास रेसिपी- चकल्या होतील खुसखुशीत

२ टेबलस्पून कोथिंबीर

चवीनुसार मीठ

८ ते १० मनुका

अर्धा कप काजू

कृती 

सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल आणि बटर टाका आणि नंतर त्यात उभे चिरलेले कांदे टाकून परतून घ्या. 

 

कांद्याला सोनेरी रंग आला की त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, आलं, थोडंसं मीठ, हिरव्या मिरच्या टाका आणि सगळं परतून घ्या. मिरच्या, लसूण, आलं परतून झालं की त्यामध्ये मनुका आणि काजू टाका. कढईतले सगळे पदार्थ परतून झाले की त्यामध्ये जाडसर चिरलेले टोमॅटो, लाल तिखट आणि कोथिंबीर घाला.

दिवाळीच्या आधी त्वचेवर करा ग्लिसरीनची जादू! चेहरा एवढा चमकेल की सगळे बघतच राहतील..

टोमॅटो परतून झाल्यानंतर कढईमध्ये १ कप पाणी टाका आणि कढईवर झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटे वाफ येऊ द्या.

यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड झाल्यानंतर ते मिक्सरमधून वाटून घ्या. ही तयार झालेली ग्रेव्ही पुर्णपणे थंड झाल्यानंतर एअर टाईट डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा. 

कोणीही मसालेदार भाजी करायची असेल तेव्हा थोडंसं तेल टाकून ही ग्रेव्ही परतून घ्यायची. त्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं पाणी आणि तुम्हाला जी भाजी करायची आहे ती भाजी घालायची. अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी चमचमीत भाजी घरच्याघरी तयार..

या ग्रेव्हीपासून तुम्ही काजू मसाला, पनीर मसाला, मिक्स व्हेज, कोल्हापुरी व्हेज, शेवभाजी, बैंगन मसाला, आलू मसाला, आलू मटार, मसाला कोफ्ता, व्हेज कढई अशा वेगवेगळ्याा प्रकारच्या भाज्या करू शकता. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.