Join us  

२ वाटी तांदळाच्या पिठाचे इन्स्टंट आप्पे करण्याची सोपी रेसिपी, डाळ-तांदूळ न भिजवता आप्पे करण्याची झटपट कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2023 1:37 PM

how to make rice appe | paniyaram | South Indian rice appe आप्पे आवडतात, नाश्त्यासाठी उत्तम -आता तांदळाच्या पिठाचेही करता येईल झटपट आप्पे

सकाळचा नाश्ता हेल्दी आणि चविष्ट पदार्थांनी केला तर, संपूर्ण दिवस आनंदात जातो. नाश्त्यात लोकं पोहे, उपमा, इडली, डोसे, मेदू वडे हे पदार्थ आवडीने खातात. यासह गरमागरम आप्पे देखील नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. नाश्त्यासाठी गरमागरम आप्पे आणि ओल्या नारळाची चटणी मिळाली, की मनसोक्त अगदी पोटभर नाश्ता होतो. त्यानंतर दुपारपर्यंत भूक काही लवकर लागत नाही. आप्पे करण्याचे देखील विविध प्रकार आहेत.

काही जण डोश्याच्या पीठाचे आप्पे तयार करतात तर काही, तांदुळाचे पीठ, रवा, मिश्र डाळींचे आप्पे, गोड आप्पे, तिखट मसालेदार आप्पे तयार करतात. जर आपल्याकडे नाश्ता बनवायला वेळ नसेल, व झटपट नाश्ता तयार करायचा असेल तर, तांदुळाच्या पीठाचे इन्स्टंट आप्पे तयार करून पाहा. नारळाच्या चटणीसोबत आप्पे भन्नाट लागतात(how to make rice appe | paniyaram | South Indian rice appe).

तांदुळाच्या पीठाचे इन्स्टंट आप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदुळाचे पीठ

दही

रवा

पाणी

कांदा

खास लग्नाच्या पंगतीसाठी करतात तशी चविष्ट कोबीची भाजी करा घरी, कोबी न आवडणारेही खातील चवीने

ढोबळी मिरची

कडीपत्ता

हिरवी मिरची

कोथिंबीर

मीठ

लाल तिखट

बेकिंग सोडा

ओवा

तेल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ कप तांदुळाचे पीठ घ्या, त्यात एक कप रवा, एक कप दही घालून चमच्याने मिक्स करा. त्यानंतर त्यात एक कप पाणी घालून साहित्य एकजीव करा. त्यावर १५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. रवा फुलल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, ढोबळी मिरची, कडीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. त्यानंतर चवीनुसार मीठ, एक चमचा लाल तिखट, एक चमचा गरम मसाला, एक चमचा खाण्याचा सोडा आणि एक चमचा ओवा घालून चमच्याने मिक्स करा.

बेसनाचे मऊसूत तलम लाडू करण्यासाठी घ्या खास रेसिपी, खमंग बेसन लाडू गणपतीत नैवेद्याला हवाच..

आता आप्पे पात्राला ब्रशने तेल लावून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. आप्पे पात्र गरम झाल्यानंतर त्यात चमच्याने बॅटर सोडा. व गॅस मध्यम आचेवर ठेऊन त्यावर झाकण ठेवा. २ ते ३ मिनिटानंतर झाकण बाजूला काढा, व आप्पे शिजले आहेत की नाही हे चेक करा. आप्पे एका बाजूने शिजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील शिजवून घ्या. व आप्पे तयार झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवा. अशा प्रकारे आप्पे खाण्यासाठी रेडी. आपण हे आप्पे नारळाची चटणी किंवा सांबरसह खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स